गुजरात, बिहार राज्यांपाठोपाठ आता ओडिशा राज्यातील नवनिर्वाजित मोहर चरण माझी सरकार राज्यात दारुबंदी करण्याचा विचारात आहे. राज्यात टप्प्याने दारुमुक्त करण्याचा सरकारचा विचार असल्याचे संकेत मंत्री नित्यानंद गोंड यांनी दिले आहेत. (Liquor ban)
ओडिशाचे सामाजिक सुरक्षा आणि दिव्यांग सक्षमीकरण मंत्री नित्यानंद गोंड यांनी ओडिशा टी.व्ही. शी बोलताना सांगितले की, सरकार संपूर्ण राज्यात दारू बंदी घालण्याची योजना आखत आहे. फक्त महसूल बुडण्याच्या भीतीने मद्यविक्रीला प्रोत्साहन देता येणार नाही. दारूच्या व्यसनामुळे समाज प्रदूषित होत आहे. दारूचे व्यसन जीवन उद्ध्वस्त करत आहे. आमचे सरकार ओडिशाला मद्यमुक्त बनविण्याचा आणि अंमली पदार्थांच्या वापरास परावृत्त करण्याचा विचार करेल." ( Liquor ban )
सरकारी स्तरावर अनेक राज्यांमध्ये दारूवर बंदी घालण्यात आली आहे. आमचे सरकारही तेच करण्यासाठी कटिबद्ध आहे. याबाबत अबकारी व इतर विभागांशी चर्चा करून आवश्यक ती पावले उचलली जातील. आम्ही टप्प्याटप्प्याने ओडिशाला दारूमुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नित्यानंद गोंड यांनी स्पष्ट केले. ( Liquor ban)
देशातील काही राज्यांमध्ये दारुबंदी लागू आहे. यामध्ये बिहार, गुजरात, मिझोराम आणि नागालँड या राज्यांचा समावेश आहे.