

Bengal Babri Masjid Row
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेला काही महिन्यांचा कालावधी राहिला असतानाच बाबरी मशिदीच्या शैलीतील मशिदीचा पायाभरणी कार्यक्रमानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूक कबीर यांनी शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर येथे कबीर यांनी मशिदीची पायाभरणी केली. या कार्यक्रमानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये या मशिदीच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांची देणगी मिळाली आहे.
शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर येथे कबीर यांनी मशिदीची पायाभरणी केली. यानंतर मिळालेल्या देणग्यांची रक्कम सुमारे ३ कोटींवर रुपयांवर पोहोचली आहे, असा दावा हुमायून कबीर यांच्या सहकार्यांनी केला.
हुमायून कबीर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मशिद उभारणीच्या ठिकाणी देणगीसाठी १२ पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. आतापर्यंत या पेट्यांच्या माध्यमातून ५.७ दशलक्ष रुपये मिळाले आहेत. तर २.४७ कोटी रुपये क्यूआर कोड पेमेंटद्वारे मिळाले आहेत. देणगीसाठी पायाभरणीच्या ठिकाणी एक देणगी पेटी शिल्लक आहे.
शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर येथे कबीर यांनी मशिदीची पायाभरणी कार्यक्रम झाला. यानंतर सोमवारपर्यंत ( दि. ८ डिसेंबर) १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. मशिदी बांधण्याच्या मोहिमेअंतर्गत सुमारे १.३ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. कबीर यांच्या निकटवर्तींनी स्पष्ट केले की, विविध ठिकाणी ठेवलेल्या देणगी पेट्या जवळजवळ भरल्या होत्या. रात्रभर पैसै मशीनच्या सहाय्याने मोजले जात होते. रोख आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे देणगी जमा होत आहे. सोमवारी कबीर यांच्या निकटवत्तींनी सांगितले की, चार दानपेट्या आणि एका पोत्यातून किमान ₹३७.३३ लाख रोख रक्कम मोजण्यात आली आहे, तर QR कोडद्वारे ऑनलाइन देणग्या ₹९३ लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत, ज्यामुळे एकूण रक्कम ₹१.३० कोटी झाली आहे. आणखी सात सीलबंद पेट्या उघडायच्या आहेत.
तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायूक कबीर यांनी शनिवारी कडक सुरक्षेत मुर्शिदाबादमधील रेजीनगर येथे एका मशिदीची पायाभरणी केली. त्यांच्या या कृतीमुळे बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तृणमूल काँग्रेसने कबीर यांना पक्षातून निलंबित केले होते. आमदार हुमायून कबीर यांनी शनिवारी बाबरी मशिदीच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे भूमिपूजन केले. याच्या दुसऱ्या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कबीर यांनी २२ डिसेंबर रोजी आपला स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एमआयएम' (AIMIM) सोबत युती करण्याचा प्रयत्न करण्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल निवडणुकीत विधानसभेच्या २९४ पैकी १३५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. यामुळे आपण राज्याच्या राजकारणात 'गेम-चेंजर' ठरू, असा दावा त्यांनी केला आहे.