Crime News: इंटरव्ह्यूच्या बहाण्यानं इडन गार्डनजवळ बोलवून घेतलं अन् जिवंत जाळलं... मृत्यूपूर्वी पीडित तरूणीनं काय सांगितलं?

Crime News
Crime Newspudhari
Published on
Updated on

Kolkata Eden Gardens Crime News: पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील प्रसिद्ध ईडन गार्डनजवळ एका ३० वर्षाच्या महिलेला जिवंत जाळण्याचा प्रकार समोर आला होता. या महिलेचा मृत्यू झाला आहे. ईडन गार्डनजवळ ३० वर्षाच्या महिलेला कथितरित्या केरोसीन टाकून जाळण्यात आळं होतं. या घटनेत ती गंभीररित्या भाजली होती. तिला SSKM रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.

Crime News
Honour killing | गुजरातमध्ये 'सैराट'चा थरार; वडील आणि भावाने केली प्रेमी युगुलाची हत्या

इंटरव्हूच्या बहाण्यानं बोलवलं अन्...

मृत तरूणीच्या आईच्या म्हणण्यानुसार तिच्या मुलिला इंटरव्ह्यूच्या बहाण्यानं गंगा सागर मैदान इथं बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी सांयकाळी ४ वाजता आपल्या मुलीला फोन केला. हा फोन पोलीस अधिकाऱ्यांनी उचलला होता आणि त्यांनी घडलेली संपूर्ण घटना सांगितली. या घटनेत मुलगी ९० टक्के भाजली होती. मृत्यूपूर्वी या महिलेनं आई आणि पोलिसांना सांगितलं की तिच्यावर सिद्धार्थने केरोसिन टाकून आग लावली.

Crime News
Crime news |१८ मुलांचा बाप, २ बायका अन् तिसरीशी प्रेमसंबंध; अनैतिक संबंधातून माजी सरपंचाचा निर्घृण खून

आंतरधर्मीय विवाहासाठी दबाव

मृत महिलेच्या आईने दावा केला आहे की आरोपी सिद्धार्थने आपल्या मुलीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. तिने आपल्या शेवटच्या वक्तव्यात सांगितलं होतं की तिनं लग्नाला नकार दिला होता कारण या दोघांचे धर्म वेगवेगळे होते. ती म्हणाली होती की, तू हिंदू आहेस मी मुस्लीम आहे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.' आरोपीने मुलीला नोकरीचे अमिष देखील दाखवले होते. महिलेने ती ऑफर नाकारली होती.

Crime News
Crime News: मैत्रीला काळिमा! जीवाभावाच्या मित्राने पत्नीसोबत सूत जुळवलं; सहन नाही झालं अन् पतीने दोघांनाही संपवलं

हत्येचा गुन्हा दाखल

पोलिसांनी पीडित महिलेच्या वक्तव्याच्या आधारे आरोपी सिद्धार्थ चारीवालला बेलियाघाटामधून अटक करण्यात आली आहे. शनिवारी त्याला बँकशाल कार्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आला होता. सरकारी वकील अरूप चक्रवर्ती यांनी सांगिलं की सुरूवातीला हे प्रकरण भारतीय न्याय संहितेचे कलम १०९ हत्येचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता महिलेचा मृत्यू झाला असल्याने पोस्टमार्टम रिपोर्ट आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे हे प्रकरण कलम १०३ हत्या अंतर्गत बदलण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news