

Shocking crime news
प्रतापगड : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सुमेरपूर गावचे माजी सरपंच मुस्तका गुलशन ऊर्फ मुन्ना यांचा मृतदेह एका कालव्यात पोत्यात भरलेल्या अवस्थेत सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या भावाला अटक केली असून धक्कादायक खुलासे झाले आहेत.
मुन्ना यांचे आधीच दोन विवाह झाले होते आणि त्यांना १८ मुले (प्रत्येक पत्नीपासून ६ मुले आणि ३ मुली) आहेत. यानंतरही त्याचे गावातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. महिलेचा पती कामासाठी गावाबाहेर असल्याने मुन्ना तिला मदत करायचे, मात्र या मैत्रीचे रूपांतर नंतर अनैतिक संबंधात झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्ना सुमनवर वारंवार भेटण्यासाठी दबाव टाकत होते आणि तिला ब्लॅकमेल करत होता. या छळाला कंटाळून सुमनने आपल्या भावाला माहिती दिली. दोघांनी मिळून मुन्नाचा काटा काढण्याचा कट रचला.
१८ मार्च रोजी विवाहित महिलेने मुन्नाला आपल्या माहेरी बोलावले. मुन्ना खोलीत शिरताच सुमनचा भाऊ आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून कालव्यात फेकून दिला होता.
मुन्ना बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी नोंदवली. तपासादरम्यान पोलिसांना मुन्ना यांची मोटारसायकल एका वेगळ्या ठिकाणी सापडली. कॉल रेकॉर्ड्स तपासले असता पोलिसांचा संशय सुमनवर गेला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. महिलेने दिलेल्या माहितीवरुन कालव्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.