Parliament Monsoon Session | ऑपरेशन सिंदूर, न्या. वर्मा यांच्यावर महाभियोग, पहलगाम हल्ल्यावर चर्चेस सरकार तयार

Parliament Monsoon Session | सर्वपक्षीय बैठकीनंतर मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती; संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून, 17 विधेयके पटलावर
Kiren Rijiju
Kiren RijijuPudhari
Published on
Updated on

Parliament Monsoon Session 2025 central minister Kiren Rijiju on all party meet

नवी दिल्ली : केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी स्पष्ट केलं की, केंद्र सरकार ऑपरेशन सिंदूर, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे युद्धबंदीचे दावे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी पूर्णतः तयार आहे.

"कोणत्याही विषयावरून सरकार मागे हटणार नाही, सर्व प्रश्न संसदेच्या पटलावर घेतले जातील," असे रिजिजू यांनी सांगितले. रविवारी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर रिजिजू माध्यमांशी संवाद साधत होते.

17 विधेयके मांडणार

"सध्या 17 विधेयके तयार असून ती या अधिवेशनात मांडण्यात येतील," अशी माहितीही रिजिजू यांनी दिली. या अधिवेशनात विविध क्षेत्रांतील महत्त्वाचे विषय चर्चेत येणार आहेत.

रिजिजू यांनी सांगितले की, "संसदेच्या सुरळीत कामकाजासाठी सरकार व विरोधक यांच्यात समन्वय आवश्यक आहे. आम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेला तयार आहोत. संसदीय नियम व परंपरांचा आम्ही आदर करतो," असे त्यांनी स्पष्ट केले.

Kiren Rijiju
Lakshadweep Bitra Island | लक्षद्वीपमधील बेट केंद्र सरकार घेणार ताब्यात; लष्करासाठी वापर करणार, निर्णयाविरोधात स्थानिकांत संताप

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग प्रस्ताव

एक मोठी घडामोड म्हणजे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग प्रस्ताव संसदेत मांडण्याची केंद्राची योजना आहे.

"100 हून अधिक खासदारांनी महाभियोगासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत," अशी माहिती देत, रिजिजू म्हणाले, "हा निर्णय फक्त सरकारचा नसून सर्वपक्षीय आहे. मात्र, प्रस्ताव मांडण्याचा नेमका कालावधी ठरवलेला नाही, तो लवकरच जाहीर केला जाईल."

ट्रम्प यांच्या सीझफायर दाव्यांवर संसदेत उत्तर देणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या युद्धबंदीच्या दाव्याबाबत विरोधक चर्चा करणार असल्याची शक्यता असून, त्यावर प्रतिक्रिया देताना रिजिजू म्हणाले, "सर्व प्रश्नांची उत्तरे संसदेत दिली जातील, संसदबाहेर नाही."

Kiren Rijiju
Apache Arrival Jodhpur | अमेरिकेतून तीन अपाचे हेलिकॉप्टर जोधपूरच्या दिशेने रवाना; पश्चिम सीमेवर देणार पहारा...

सर्वपक्षीय बैठक फलदायी

सर्वपक्षीय बैठकीत 51 राजकीय पक्षांच्या 54 खासदारांनी सहभाग घेतला. मंत्री रिजिजू म्हणाले, "विरोधक, सत्ताधारी व अपक्ष सर्वांनी आपले मुद्दे मांडले. आपले विचार भिन्न असू शकतात, पण संसद सुरळीत चालवणे ही सर्वांची जबाबदारी आहे."

लहान पक्षांना बोलण्याची वेळ कमी मिळते, यावर त्यांनी सहमती दर्शवली व सांगितले की लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापतींसोबत चर्चा करून या विषयी योग्य निर्णय घेतला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news