Lakshadweep Bitra Island | लक्षद्वीपमधील बेट केंद्र सरकार घेणार ताब्यात; लष्करासाठी वापर करणार, निर्णयाविरोधात स्थानिकांत संताप

Lakshadweep Bitra Island | बेटावरील 350 लोकसंख्या स्थलांतरीत केली जाण्याची शक्यता
Lakshadweep Bitra Island
Lakshadweep Bitra Islandx
Published on
Updated on

Lakshadweep Bitra Island

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लक्षद्वीपमधील बित्रा बेट राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत ते संरक्षण उद्देशासाठी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सामाजिक परिणाम मूल्यांकन (Social Impact Assessment – SIA) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे बेटावरील स्थानिक रहिवाशांमध्ये अस्वस्थता आणि चिंता पसरली आहे.

बित्रा बेटाची पार्श्वभूमी

बित्रा हे लक्षद्वीपच्या 10 वसती बेटांपैकी एक असून सध्या येथे 105 कुटुंबे राहतात. या बेटावरील रहिवाशांची एकूण लोकसंख्या सुमारे 350 इतकी आहे. बेटाचे क्षेत्रफळ अंदाजे 0.091 चौ. कि.मी. असून 45 चौ. कि.मी. क्षेत्रफळाचा मोठा लॅगून (lagoon) आहे. हे लॅगून भाग मुख्यतः स्थानिक मच्छिमारांद्वारे मासेमारीसाठी वापरला जातो.

Lakshadweep Bitra Island
Polyandry in Himachal | दोन भावांचे एकाच मुलीशी लग्न! हिमाचलमध्ये अनोखा विवाह; जाणून घ्या हट्टी समुदायातील दुर्मिळ द्रौपदी प्रथा?

SIA आणि सरकारी अधिसूचना

लक्षद्वीप महसूल विभागाने 11 जुलै रोजी अधिसूचना जारी करत सामाजिक परिणाम मूल्यांकनासाठी आदेश दिला आहे. यामध्ये सांगितले आहे की बित्रा बेटाची पूर्ण मालमत्ता संरक्षण आणि धोरणात्मक यंत्रणांकडे हस्तांतरित करण्यात येईल.

जिल्हाधिकारी शिवम चंद्र यांनी स्पष्ट केले की, SIA दोन महिन्यांत पूर्ण होईल आणि स्थानिक ग्रामसभा, रहिवासी यांचा यामध्ये सहभाग राहील. ही प्रक्रिया ‘भूमी संपादन, पुनर्वसन व स्थलांतर अधिनियम 2013’ अंतर्गत करण्यात येत आहे.

खासदारांचा विरोध

लक्षद्वीपचे खासदार हामदुल्ला सईद यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. "सरकारने स्थानिक जनतेच्या जीवनशैलीचा विचार न करता हा निर्णय घेतला आहे. हे बेट वसतीयुक्त असून येथे शाळा, आरोग्य केंद्र आहे. याचा परिणाम संपूर्ण लक्षद्वीपमधील मच्छीमारांवर होणार आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

सईद म्हणाले की, "केंद्र सरकारच्या या निर्णयाला आम्ही कायदेशीर आणि राजकीय पातळीवर आव्हान देणार आहोत. बित्रा बेटावरुन लोकांना हटवणे हा अन्याय आहे."

Lakshadweep Bitra Island
Apache Arrival Jodhpur | अमेरिकेतून तीन अपाचे हेलिकॉप्टर जोधपूरच्या दिशेने रवाना; पश्चिम सीमेवर देणार पहारा...

स्थानिकांची चिंता

स्थानिक नागरिक म्हणतात की, "बित्रा हे बेट केवळ आमचं घर नाही, तर आमचा उदरनिर्वाह याच बेटावर आधारित आहे. मासेमारी, नारळ शेती, शिक्षण, आरोग्य सेवा यासाठी आम्ही या बेटावर अवलंबून आहोत. जर आम्हाला इथून हलवलं गेलं, तर आमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल."

बेत्रा बेटावरील लोकांचा इतिहास, जीवनशैली आणि सागरी संसाधनांवर आधारित अर्थव्यवस्था लक्षात घेतल्यास हा निर्णय स्थानिकांवर मोठा परिणाम करू शकतो. याचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी उपयोग होईलच, पण त्याचबरोबर मानवतावादी दृष्टिकोनातूनही सरकारने विचार करणे आवश्यक आहे.

Lakshadweep Bitra Island
Delta flight engine fire | विमानाच्या इंजिनाने हवेतच घेतला पेट; विमानात आणीबाणीची परिस्थिती, पाहा व्हिडिओ

संरक्षण दृष्टिकोनातून लक्षद्वीप महत्वाचे

मागील वर्षी मिनिकॉय बेटावर INS जटायू हे नौदल ठाणं सुरू करण्यात आलं होतं. हे लक्षद्वीपच्या संरक्षणात्मक योजनांचा एक भाग आहे.

लक्षद्वीप हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश असून, येथे 10 वसती बेटं, 17 अवसती बेटं आणि अनेक प्रवाळ बेटं आहेत. संपूर्ण लक्षद्वीपचा भूप्रदेश केवळ 32 चौ. कि.मी. असला तरी त्याच्या आजूबाजूला सुमारे 4200 चौ. कि.मी. क्षेत्रफळाचा सागरी हद्दीचा प्रदेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news