

Shocking Crime News: केरळमधील एका ४२ वर्षाच्या पुरूषानं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे त्याच्यावर महिलेने बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर दीपक यांनी टोकाचा निर्णय घेतला.
ही घटना कोझीकोडमधील गोविंदपूरम येथे रविवारी घडली. या पुरूषाचं नाव दीपक यु असं आहे. त्यांनी आपल्या रूममध्ये गळफास लावून घेतला. ज्यावेळी त्याचे कुटुंबीय त्याला जागे करण्यासाठी सकाळी ७ वाजता त्याच्या खोलीत गेले त्यावेळी ही घटना समोर आली. अनेकवेळा दार ठोठावलं तरी दीपक यांनी दार उघडलं नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडला त्यावेळी दीपक मृत अवस्थेत आढळून आले.
दीपक हे ज्यावेळी सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासून ते मानसिक तणावात होते. हा कथित लैंगिक छळाचा व्हिडिओ २० लाख लोकांनी पाहिला होता असे वृत्त ANI ने दिले आहे. दीपक यांच्या कुटुंबियांनी त्या महिलेने ऑनलाईन पब्लिसिटीसाठी दीपक यांचे चारित्र्य हनन केल्याचा आरोप केला आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक महिलेने दावा केला ती गर्दी असलेल्या बसमधून प्रावस करत असताना की एका व्यक्तीने तिला अयोग्यरित्या अनेकवेळा स्पर्श केला. दरम्यान, दीपक यांच्या नातेवाईकांनी ज्यावेळी हा व्हिडिओ इंटरनेटवर आला त्यावेळी त्या पुरूषाला ऑनलाईन ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो मानसिक तणावात आला होता. त्याला या परिस्थितीवर मात करता आली नाही म्हणून त्यानं आपलं जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्या महिलेनं या पुरूषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता त्या महिलेकडून अजून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. ज्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी त्या महिलेविरूद्ध देखील ऑनलाईन ट्रोलिंग झाले होते.