Birth Certificate Case| विवाहबाह्य अपत्याच्या जन्म दाखल्यातील बदलासाठी हायकोर्टाने वापरला 'विशेषाधिकार'! नेमके प्रकरण काय?

माजी पतीच्या परवानगीनंतर निर्णय, उच्‍च न्यायालयाने पालकांच्‍या भूमिकेवर व्‍यक्‍त केली तीव्र नाराजी
Birth Certificate Case
प्रातिनिधिक फोटो.
Published on
Updated on

Kerala High Court Birth Certificate Case

तिरुवनंतपुरम : एका संवेदनशील प्रकरणात केरळ उच्‍च न्‍यायालयाने आपल्या विशेष अधिकारांचा वापर करत विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या अल्पवयीन मुलीच्या जन्म दाखल्यात (जैविक) वडिलांचे नाव नोंदवण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, आईच्या माजी पतीने या बदलाला संमती दर्शवल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.

कुटुंबाने घेतली होती उच्‍च न्‍यायालयात धाव

'लाईव्‍ह लॉ'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, संबंधित महिलेचा विवाह एका व्यक्तीशी झाला होता. या विवाहादरम्यान तिला एक मुलगा झाला. मात्र कालांतराने पतीने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही, असा आरोप महिलेने केला. याच काळात या महिलेला एका मुलीचा जन्म झाला. कागदोपत्री या मुलीच्या वडिलांच्या जागी तिच्या आईच्या तत्कालीन पतीचे नाव नोंदवण्यात आले होते. सुमारे सहा वर्षांनंतर पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर महिलेने मुलीच्या जैविक पित्याशी विवाह केला. मुलीला शाळेत प्रवेशासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी जन्म दाखल्यावर खऱ्या वडिलांचे नाव असणे आवश्यक असल्याचे कारण देत या कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Birth Certificate Case
dating app case |सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना ब्रेकअपनंतर गुन्हेगारी स्वरूप देणे चुकीचे : हायकोर्ट

न्यायालयाने पालकांच्‍या भूमिकेवर व्‍यक्‍त केली तीव्र नाराजी

पालकांनी अल्‍पवयीन मुलीचे नाव दुरुस्‍त करण्‍यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर केरळ उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती पी. व्ही. कुन्हिकृष्णन यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हिकृष्णन यांनी याचिकाकर्त्या पालकांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळेने नाव बदलल्याशिवाय प्रवेश नाकारला, या दाव्यावर शंका घेत, "शाळेला हे कसे समजले की दाखल्यावरील व्यक्ती तिचे वडील नाहीत?" असा सवाल करत याचिकाकर्त्यांनी स्वतःहून ही माहिती शाळेला दिली असावी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याचिकेत मुलीचे नाव उघड केल्याबद्दलही खंडपीठाने पालकांना फटकारले.

माजी पतीच्या सभ्य वर्तनाचे केले कौतुक

याचिकेवर सुनावणी सुरू असताना, याचिकाकर्त्या मुलीच्या आईच्या माजी पतीने न्यायालयात स्पष्ट केले की, जन्म दाखल्यातून आपले नाव हटवून खऱ्या वडिलांचे नाव लावण्यास त्यांची कोणतीही हरकत नाही. त्यांच्या या 'सभ्य' वर्तनाचे न्यायालयाने कौतुक केले.

Birth Certificate Case
Caste Identity | "धर्मांतर केले असो किंवा आंतरजातीय विवाह, व्यक्तीची जात बदलत नाही" : हायकोर्ट

मुलीसाठी न्‍यायालयाने केला विशेष अधिकारांचा वापर

न्‍यायमूर्ती पी. व्ही. कुन्हिकृष्णन यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले की, संबंधित मुलगी जेव्हा मोठी होईल, तेव्हा तिला कोणत्याही मानहानीकारक किंवा अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, म्हणून जन्मदाखल्यातील नावात बदल करणे आवश्यक आहे. अन्याय दूर करण्यासाठी आणि पूर्ण न्याय देण्यासाठी हे न्‍यायालय भारतीय संविधानाच्या कलम २२६ अंतर्गत त्याच्या विशेष अधिकारांचा वापर करत आहे.

Birth Certificate Case
cane punishment in schools | विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकाने छडीचा वापर करणे हा गुन्हा नाही : हायकोर्ट

न्‍यायालयाने दिले महापालिका प्रशासनाला आदेश

उच्‍च न्‍यायालयाने विशेषाधिकाराचा वापर करत महापालिका प्रशासनाला आदेश दिला की, योग्य अर्जाची पडताळणी करून जन्म नोंदणी पुस्तकाच्या समासात वडिलांच्या नावाबाबत सुधारित नोंद करावी. तसेच मूळ नोंदीत खाडाखोड न करता ही नवीन नोंद करून ३० दिवसांच्या आत नवीन जन्म दाखला देण्यात यावा. मुलीच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी तिचे आणि तिच्या आईच्या माजी पतीचे नाव सार्वजनिक न करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news