Chardham Yatra 2025 | हर हर महादेव...! केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले

केदारनाथ परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमला, मंदिरावर पुष्पवृष्टी, भाविकांमध्ये मोठा उत्साह
chardham yatra 2025
Chardham Yatra 2025 : चारधाम यात्रेचा शुभारंभ ३० एप्रिलपासून, सुरक्षेची तयारी सुरूFile Photo
Published on
Updated on

रुद्रप्रयाग : केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे आहे. यावेळी हजारो भाविकांनी दरवाजे उघडण्याच्या पवित्र क्षणाचे साक्षीदार झाले. मंदिराचे दरवाजे उघडताच केदार खोरे हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले.

हेलिकॉप्टरमधून भाविकांवर पुष्पवृष्टी

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या काही वेळ आधी, राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी केदारनाथला पोहोचले. दरवाजे उघडताच, हेलिकॉप्टरमधून भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी प्रथम दर्शन घेतले. धाममध्ये पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिली पूजा करण्यात आली.

अक्षय्य तृतीयेपासून 'चारधाम' यात्रेला प्रारंभ

यावेळी मुख्यमंत्री धामी म्हणाले की, अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने बुधवार ३० एप्रिल रोजी चारधाम यात्रा सुरू झाली आहे. आजपासून दोन दिवसांनी भगवान बद्रीनाथ विशालचे दरवाजे देखील उघडतील आणि यात्रा पूर्ण जोमात सुरू होईल. भाविकांचा प्रवास सुरक्षित राहावा आणि त्यांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत आणि त्यासाठी आम्ही योग्य व्यवस्था केली आहे.

chardham yatra 2025
'केदारनाथ'ला जाण्यासाठी १२.९ किमी लांबीचा रोप वे, ८-९ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत

माझ्यासाठी भाग्याचा क्षण; मुख्यमंत्री धामी

पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, श्री केदारनाथ धाम त्याच्या सर्व भव्यतेने सजवण्यात आले आहे आणि तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) सकाळी शुभ मुहूर्तावर योग्य विधींसह दार उघडल्यानंतर, भाविकांना देवाधिशदेव महादेव केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येईल. श्री केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या वेळी मीही उपस्थित आहे, हा माझ्यासाठी खूप भाग्याचा क्षण आहे.

chardham yatra 2025
PM Modi at kedarnath : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक

केदारनाथ मंदिर १०८ क्विंटल फुले आणि हारांनी सजवले

यात्रेनिमित्त दरवाजांच्या उद्घाटनासाठी मंदिर १०८ क्विंटल फुले आणि हारांनी सजवण्यात आले आहे. त्याच वेळी, सरकार, प्रशासन आणि पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांसह, सुरक्षा दल देखील तैनात आहेत. केदारनाथमध्ये १५ हजारांहून अधिक भाविकांच्या रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय प्रसाद थापलियाल म्हणाले की, दरवाजे उघडल्यानंतर दर्शनासाठी टोकन प्रणाली लागू केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news