PM Modi at kedarnath : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक

PM Modi at kedarnath : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते आज (दि. ५) केदारनाथ मंदिरात आद्‍य शंकराचार्यांच्‍या प्रतिमेचे अनावरण झाले. ( PM Modi at kedarnath)  यावेळी त्‍यांच्‍या हस्‍ते १५ मिनिटे विशेष पूजा झाली. रुद्राभिषेक झाल्‍यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विश्‍व कल्‍याणाची प्रार्थना केल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी केदारनाथ धाम येथे दाखल झाले. ( PM Modi at kedarnath)  त्‍यांच्‍या हस्‍ते   शंकराचार्यांच्‍या प्रतिमेचे अनावरण झाले. येथील मंदिरात त्‍यांनी रुद्राभिषक करत बाबा केदारनाथांची पूजा केली. तसेच रुद्राभिषेकही केला. सुमारे १५ मिनिटे पंतप्रधान मोदी यांनी मंदिरात पूजा केली. यानंतर त्‍यांनी मंदिराला प्रदक्षिणाही घातली.

येथील प्रत्‍येक कणाशी मी जोडला जातो

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांचे लोकार्पण केले. यानंतर पंतप्रधान मोदी म्‍हणाले की, भारताला महान ऋषि परंपरा आहे. ही परंपरा एवढी व्‍यापक आहे की ,महान ऋषि आणि संतांची नाव सांगायची म्‍हटली तरी एक आठवड्यांपेक्षा अधिक काळ लागले. आपल्‍या देशामधील अध्‍यात्‍मिक शक्‍ती महान आहे. जेव्‍हा मी केदारनाथाला दर्शनाला येतो तेव्‍हा येथील प्रत्‍येक कणाशी जोडला जातो. येथील अध्‍यात्‍मिक उर्जा ही शब्‍दात व्‍यक्‍त केली जावू शकत नाही.

जो सर्वांचे कल्‍याण करतो तोच खरा शंकर आहे, हे आद्‍य शंकराचार्यांनी आपल्‍या आचरणातून सिद्‍ध केले होते. त्‍यांचे संपूर्ण जीवन हे जनकल्‍याणासाठी समर्पित होते. त्‍यांचे जीवन हे भारत आणि विश्‍वाच्‍या कल्‍याणासाठी होते, असेही पंतप्रधान मोदी म्‍हणाले.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news