श्रीनगर ः जम्मू-काश्मीरला कदापिही पाकिस्तान होऊ देणार नसल्याचा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिला.
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, पाकिस्तानने सीमेपलीकडील कुरापती थांबविण्याची गरज आहे. भारतासोबत चांगले संबंध हवे असल्यास भारतातील दहशतवादी कारवाया पाकच्या सत्ताधीशांनी रोखण्याची गरज आहे. काश्मीरचे पाकिस्तान कधीच होऊ देणार नाही. आम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठेने राहू द्यावे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचे थांबवले नसल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही अब्दुल्ला यांनी दिला. ते पुढे म्हणाले, गेल्या 75 वर्षांत शेजार्यांना जम्मू-काश्मीर पाकिस्तानात बनवता आलेेले नाही. आमच्या निष्पाप लोकांना ते मारत आहेत. मग यांच्यासोबत चर्चा कोणत्या मुद्द्यावर करायची असा सवाल करीत दहशतवाद न थांबविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.