

Cruelty In live-in Relationships Section 498A Punishment:
कर्नाटक उच्च न्यायालयानं भारतीय दंड संहितेतील कलम 498 हे क्रूरतेसंदर्भातील कलम फक्त लग्न झालेल्या पती किंवा त्यांच्या कुटुंबियांविरूद्ध लागू होत नाही तर हे कलम लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये देखील लागू होत असं महत्वाचा निर्णय दिला आहे.
१८ नोव्हेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरज गोविंदराज यांनी पती ही संकल्पना फक्त वैध लग्नामधील पुरूष इथपर्यंत मर्यादित नसल्याचं सांगितलं. त्यांनी ही संकल्पना लग्न सदृष्य संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप यामध्येही लागू होते.
भारतीय दंड संहिता कलम 498 अ आता भारतीय न्याय संहिता कलम ८५ आणि ८६ मध्ये रूपांतरीत झालं आहे. हे कलम पत्नीविरूद्ध पती किंवा त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या क्रूरतेविरूद्ध वापरण्यात येतं.
न्यायालय म्हणाले की, 'कलम ४९८ अ मधील पती ही संकल्पना आम्ही फक्त वैध लग्नातील पुरूष इथपर्यंतच मर्यादित मानत नाही. लग्नासारखं नातं, लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या प्रकरात देखील आम्ही पती ही संकल्पना आहे.'
एका पुरूषानं त्याच्याविरूद्ध दाखल झालेला गुन्हा हा रद्द करावा कारण ही तक्रार तिच्या दुसऱ्या पत्नीनं केली आहे अशी याचिका केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं पती या संकल्पनेबाबत आपलं निरीक्षण नोंदवलं.
तक्रारीनुसार याचिकाकर्त्याचे आधीच एक वैध लग्न झालं आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी देखील आहे. असं असतानाही त्यानं २०१० मध्ये दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. त्याचं दुसरे लग्न हे २०१६ मध्ये संपुष्टात आलं. दुसऱ्या पत्नीनं कलम 498 अ अंतर्गत तक्रार दाखल केली होती.
दुसऱ्या पत्नीनं पतीवर क्रुरता, हुंडा मागणे आणि शारीरिक हिंसाचार केल्याचे आरोप केले होते. दुसऱ्या पत्नीनं या पुरूषानं आपलं पहिलं लग्न माझ्यापासून लपवून ठेवल्याचा देखील दावा केला आहे.
मात्र याचिकाकर्त्या पतीच्या वकिलांनी त्याच्या अशिलावर कलम 498 अ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही कारण तक्रार करणारी महिला ही त्याची कायदेशीर पत्नी नाही असा युक्तीवाद केला होता. हा युक्तीवात अॅड. हर्ष कुमार गौडा यांनी केला होता.
ते आपल्या युक्तीवादात म्हणाले होते की, माझ्या अशिलाचे पहिले लग्न हे वैध असेपर्यंत दुसरं लग्न हे बेकायदेशीर ठरतं. वकिलांनी तक्रारदारासोबत माझे अशील हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते असा दावा केला. गौडा यांनी कलम 498 अ हे फक्त वैध लग्न झाले असेल तरच लागू होतं असा युक्तीवाद केला होता.
मात्र उच्च न्यायालयानं हा युक्तीवाद फेटाळून लावला. न्यायालयानं सांगितलं की कलम 498 अ हे पती किंवा तिच्या नातेवाईकांकडून केलेल्या क्रुरतेपासून महिलेचं संरक्षण करतं.
न्यायालयानं याचिकाकर्त्याची याचिका फेटाळत म्हटलं की, 'असा पुरूष जो महिलेला त्याच्यासोबतचं लग्न हे वैध आहे असा खोटा विश्वास देतो. ज्याच्यावर पत्नीविरूद्ध क्रूरपणे वागल्याचे आरोप आहेत. असा पुरूष फक्त त्याचं लग्न कायद्यानुसार वैध नाही या मुद्द्यामुळं आपली जबाबदारी टाळू शकत नाही.'
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, 'याचिकाकर्ता आणि तक्रारदार महिला एकत्र रहात होते. एकत्र रिलेशनशिपमध्ये होते. या नात्याचे सर्व कॅरेक्टरस्टिक्स हे लग्नासारखेच आहे. त्यामुळं लग्नस्वरूपातील रिलेशनशिप किंवा लिव्ह इन रिलेशनशिप हे क्रूरतेच्या कलम ४९८ अ अंतर्गत झालेल्या आरोपाअंतर्गत येतात.