

Sunjay Kapur Assets Case
नवी दिल्ली :उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरने ( Karisma Kapoor) दोन्ही मुलांनी मृत्युपत्रातील वाटा मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Sunjay Kapur, Assets Case) संजय कपूरची पत्नी प्रिया कपूर यांना त्यांची मालमत्ता विक्रीपासून रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अंतरिम मनाई अर्जावर शुक्रवारी (दि. १४ नोव्हेंबर) सुनावाणी झाली. यावेळी करिश्मा कपूरच्या वकिलांनी दावा केला केली की, गेली दोन महिने मुलीची फी भरता आलेली नाही. यावर न्यायाधीश ज्योती सिंह यांनी या सुनावणीत मला मेलोड्रामाटिक नको आहे, असे फटकारले. जाणून घेवूया सुनावणीवेळी नेमकं काय घडलं याविषयी...
करिश्माच्या मुलांचे प्रतिनिधित्व करणारे वकील महेश जेठमलानी यांनी दावा केला की अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या समायरा यांना दोन महिन्यांपासून विद्यापीठ शुल्क देण्यात आलेले नाही. त्यांनी सांगितले की, "मुलांची मालमत्ता प्रिया कपू यांच्याकडे आहे, त्यामुळे ती तिची जबाबदारी आहे. अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या मुलीला गेल्या दोन महिन्यांपासून तिचे शुल्क मिळालेले नाही. लग्नानंतरच्या करारानुसार मुलांच्या शिक्षणाची आणि राहणीमानाच्या खर्चाची जबाबदारी संजयवर आहे.
प्रिया कपूरचे वकील राजीव नायर यांनी करिश्मा कपूरच्या वकिलांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेप्रियाने करिश्मा कपूरने मुलांसाठी पाठवलेला सर्व खर्च वेळेवर पूर्ण केल्याचे सांगतले. यावेळी न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी दोन्ही पक्षांना अशा बाबी न्यायालयात आणू नयेत, असे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी प्रिया कपूर यांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील शैल त्रेहान यांना अशा बाबी योग्यरित्या हाताळण्याचे निर्देश देत स्पष्ट केले की, "मला यावर ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ घालवायचा नाही. हा मुद्दा माझ्या न्यायालयात पुन्हा येऊ नये. मला ही सुनावणी मेलोड्रॅमिक होऊ द्यायची नाही. मी ही जबाबदारी तुमच्यावर टाकत आहे. हा मुद्दा पुन्हा उपस्थित करू नये." असे स्पष्ट करत न्यायालयाने पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होईल, असे स्पष्ट करत अंतरिम मनाई अर्जावरील युक्तिवाद जलदगतीने पूर्ण करणार असल्याचेही नमूद केले.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे २००३ मध्ये विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. २०१६ मध्ये घटस्फोट झाला होता. संजयने नंतर प्रियाशी लग्न केले. संजय कपूर यांचे १२ जून २०२४ रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. संजय कपूर यांनी २१ मार्च २०२५ रोजीचे केलेल्या मृत्युपत्रानुसार संपूर्ण वैयक्तिक मालमत्ता प्रिया सचदेवा कपूर यांना देण्यात आली आहे.करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांनी त्यांची सावत्र आई प्रिया कपूर यांच्याविरुद्ध संजयचे मृत्युपत्र बनावट असल्याचा आरोप करत खटला दाखल केला आहे. त्यांचा दावा आहे की, संजयने त्यांना त्याच्या मालमत्तेत वाटा देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अंतिम मृत्युपत्रात त्यांचा समावेश नाही. दोन्ही पक्ष एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत आणि सध्या हा वाद दिल्ली उच्च न्यायालयात सुरू आहे.