Karishma Kapoor children Want Share In Sunjay Kapurs Estate :
काही महिन्यापूर्वीच उद्योगपती आणि प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूरचा घटस्फोटीत पती संजय कपूरचं निधन झालं होतं. पोलो खेळत असताना झालेल्या एका अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीच्या वाटणीवरून वाद सुरू झाला आहे. संजय कपूरला अभिनेत्री करिष्मा कपूरपासून दोन मुलं आहेत. या सर्वांना दिल्ली उच्च न्यायलायात संपत्तीत हक्क मिळावा यासाठी दावा दाखल केला आहे.
मात्र संजय कपूर यांच्या संपत्तीत फक्त करिष्मा कपूर आणि तिच्या दोन मुलांचाच दावा नाहीये तर त्याच्या अनेकांची दावेदारी आहे. दरम्यान, करिष्माच्या मुलांनी त्यांची सावत्र आई म्हणजे संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया कपूरने संजय कपूरच्या मृत्यूपत्रात फेरफार करत संपूर्ण संपत्तीवर ताबा मिळवल्याचा आरोप केला आहे. याबाबत न्यायालयात दावा देखील ठोकण्यात आला आहे.
करिष्मा कपूरची मुलं अजून अल्पवयीन असल्यानं त्यांच्या वतीनं करिष्मा ही लीगल गार्डियन म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे. या मुलांनी संपत्तीचं वाटप करण्यात यावं अशी मागणी केली आहे. संजय कपूरची संपत्ती ही ३० हजार कोटी रूपयांच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे.
यामध्ये या मुलांना त्यांच्या वडिलांचे निधन होईपर्यंत त्यांच्या संपूर्ण संपत्तीची कोणतीही कल्पना नव्हती. त्यामुळं त्यांची किती संपत्ती होती याची माहिती मिळावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. करिष्माच्या मुलांनी सांगितलं की जोपर्यंत त्यांचे वडील जिवंत होते तोपर्यंत त्यांचं त्यांच्या वडिलांसोबत जवळचं नातं होत. ते कायम वडिलांकडे सुट्टीसाठी जात होते. ते त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात सहभागी होत होते.
सुरूवातील प्रिया कपूर या संजय कपूरनं मृत्यूपत्र केलंय हेच नाकारत होती. संजय कपूरची संपूर्ण संपत्ती ही आर. के. फॅमिलीच्या ट्रस्टच्या मालकीची असल्याचं सांगितलं होतं. मात्र तिनं २१ मार्चचं एक डॉक्युमेट हे मृत्यूपत्र म्हणून समोर आणलं. त्यात हेराफेरी केल्याचा संशय असल्याचं संजय कपूर यांच्या मुलांचं म्हणणं आहे.
संजय कपूरच्या संपत्तीच्या लढाईत फक्त करिष्मा कपूरच्या मुलांचा समावेश नाहीये. तर यात अनेक व्यक्ती सहभागी आहेत. एक म्हणजे संजय कपूरची विधवा पत्नी प्रिया कपूर आणि तिची अल्पवयीन मुलं, त्यानंतर संजय कपूर यांची आई यांचा देखील समावेश आहे.