Kanpur Aircraft Crash : कानपूरजवळ प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; इन्स्ट्रक्टरसह २ वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू

आपत्कालीन यंत्रणांकडून अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू
Kanpur Aircraft Crash
कानपूरमधील गंगा बॅरेजजवळ असलेल्या नत्थूपुरवा गावाजवळील एका शेतात आज (दि. २७ ऑगस्‍ट) दुपारी दुहेरी इंजिन असलेले प्रशिक्षणार्थी विमान कोसळले.
Published on
Updated on

Kanpur Aircraft Crash : कानपूरमधील गंगा बॅरेजजवळ असलेल्या नत्थूपुरवा गावाजवळील एका शेतात आज (दि. २७ ऑगस्‍ट) दुपारी दुहेरी इंजिन असलेले प्रशिक्षणार्थी विमान कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका प्रशिक्षणार्थी पायलटसह इंस्ट्रक्टर (प्रशिक्षक) पायलटचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.

दुर्घटनाग्रस्‍त विमान गर्ग एव्हिएशनच्या कानपूर ताफ्यातील

प्राथमिक माहितीनुसार, हे विमान ‘गर्ग एव्हिएशन’चे ‘टेक्नम P2006T’ (Tecnam P2006T) मॉडेल असल्याचे समजते. गर्ग एव्हिएशनच्या कानपूर ताफ्यात या प्रकारचे एक विमान उपलब्ध आहे. तथापि, विमानाचा अधिकृत प्रकार आणि नोंदणी क्रमांकाबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) अद्याप अधिकृत पुष्टी व्हायची आहे.

Kanpur Aircraft Crash
Nepal Floods Maharashtra Helpline : नेपाळ महापुरात अडकलेल्या महाराष्‍ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी 'हेल्पलाईन' सुरु
Kanpur Aircraft Crash
POCSO Act मध्ये अल्पवयीन मुलीची संमती हा बचाव ठरू शकत नाही; 'रोमिओ-जुलिएट तत्त्व' फेटाळत हायकोर्टाकडून तरुणाची शिक्षा कायम

दोन महिन्‍यांपूर्वी झाला होता असाच अपघात

विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच कानपूर येथील गर्ग एव्हिएशनच्या फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (FTO) मध्ये असाच एक अपघात घडला होता. २६ जून रोजी रात्रीच्या सराव उड्डाणानंतर विमानातील पंखा (प्रोपेला) सुरू असताना बाहेर पडताना नवी दिल्लीतील एका महिला कॅडेट पायलटला त्याचा जोरदार फटका बसला होता. ‘VT-NBV’ नोंदणीकृत टेक्नम P2006T विमानाच्या या अपघातात महिला पायलटच्या पाठीच्या खालच्या भागाला गंभीर दुखापत झाली होती.

Kanpur Aircraft Crash
Bill Gates AI warning : 'AI'बाबत बिल गेट्स यांचं मोठं विधान; "माणसांसाठी ४०% नोकऱ्या राखीव ठेवा, अन्यथा..."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news