Kangana Ranaut | कगंना राणावत यांचा ‘झांसी’चा अवतार! जिल्हा विकास समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच झापले!

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांसोबत बैठक, निधी खर्च न झाल्यामुळे संतापल्या खासदार कंगना राणावत
kangana Ranaut
kangana Ranaut
Published on
Updated on

kangana Ranaut अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणावत यांनी आज त्‍यांच्या मंडी येथे यांनी ‘दिशा’ (DISHA - जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ची बैठक घेतली. यामध्ये त्‍यांनी त्‍यांचाच चित्रपट असलेल्या झांसीची राणीचा रुद्रावतार घेतलेला पाहायला मिळाला. त्‍यांनी बैठकीतील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसत आहे, सोशल मिडीयावर आज कगंना यांचा अवतार व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रनौत यांनी ‘दिशा’ (DISHA - जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) बैठक घेतली. यावेळी विकासकामांच्या संथ गतीवरून सरकारी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. खासदार निधी आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपलब्ध 11 कोटींपैकी केवळ 50 लाख रुपयेच खर्च झाल्याचे तिने सांगितले आणि खर्चाच्या कामगिरीचा अहवाल मागितला.

आळशी आणि अकार्यक्षम अधिकारी

बैठकीत संतापलेल्या कंगना यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर थेट ताशेरे ओढले. "अधिकाऱ्यांच्या या वृत्तीबद्दल मी राष्ट्रीय माध्यमांना काय सांगू? या खुर्च्यांवर अत्यंत आळशी (Lazy) आणि अकार्यक्षम (Incompetent) लोक बसले आहेत, असे मी सांगू का? लोक येथे फक्त पगार घेण्यासाठी येतात का?" असा थेट सवाल त्यांनी विचारला.

निधी वाटपात दिरंगाई

कंगना यांनी मतदारसंघासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी दिला असतानाही प्रत्यक्षात कामे का पूर्ण झाली नाहीत, असा जाब विचारला. मंडीमध्ये अंदाजे ५.५ कोटींपैकी केवळ ५०-६० लाख रुपयेच वापरले गेल्याचे समोर आले. दीड-दोन वर्षे प्रलंबित प्रकरणे: कामांची केवळ कारणे देण्यावर आक्षेप घेत त्या म्हणाल्या, "केवळ प्रश्न सोडवू असे म्हणण्याचा काळ संपला आहे. ही कामे दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. आता कामे तातडीने पूर्ण करा आणि पूर्ण झाल्याचा अहवाल मला द्या." असे अधिकाऱ्यांना सुनावले. दर बैठकीत अधिकारी केवळ पोकळ आश्वासने आणि 'जुमले' देत असल्याचा आरोप करत, सरकारी योजना फक्त कागदावर मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news