कंगना यांना महाराष्ट्र सदन आवडले, मुख्यमंत्र्यांची खोली न मिळाल्याने आता बदलला इरादा?

महाराष्ट्र सदन फारच आवडले; कंगना यांची मागणी पाहून उंचावल्या भूवया
kangana ranaut from Delhi
kangana ranaut fc insta page

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी आज दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात राहण्याची इच्छा व्यक्त केली. संसद अधिवेशाच्या पहिल्या दिवशी विशेष खोलीची मागणी त्यांनी त्या महाराष्ट्र सदनात दाखल झाल्या होत्या.

Summary

कंगना यांना महाराष्ट्र सदन फारचं आवडले. त्यानंतर कंगना रणौत यांनी दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

kangana ranaut from Delhi
विद्यार्थ्यांचं नुकसान कोण भरुन देणार? किरण मानेंची NEET वर पोस्ट

निवासासाठी दुसऱ्या खोल्या छोट्या असल्याने मुख्यमंत्र्यांसाठीच्या प्रशासनाकडे केली; मात्र प्रशासनाने सदर खोली देण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये राहण्याचा निर्णय बदलल्याचे सांगण्यात येते.

kangana ranaut from Delhi
प्रियदर्शनी इंदलकरचा बोल्ड अंदाज पाहून म्हणाले, फॅन्स हाय गर्मी!

खरे तर त्यांनी हिमाचल प्रदेशसाठीच्या भवनामध्ये किंवा संसद प्रशासनाने दिलेल्या निवासस्थानी राहणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी महाराष्ट्र सदनात राहण्याची इच्छा व्यक्त केल्याने सदन प्रशासनाच्याही भुवया उंचावल्या. महाराष्ट्र सदन खूप सुंदर आहे, माझे काही मित्र इथे असल्याने त्यांना भेटायला आल्याचे सदानातून बाहेर पडताना कंगना यांनी सांगितले.

kangana ranaut from Delhi
वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news