Kalaburagi gold robbery | 30 रुपयांच्या एक प्लेट पावभाजीमुळे 2.15 कोटींच्या सोन्याची चोरीचा पर्दाफाश

Kalaburagi gold robbery | कलबुर्गीतील सराफ दुकान भरदिवसा चोरले होते 3 किलो सोने, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
pavbhaji | gold theif arrest
pavbhaji | gold theif arrest Pudhari
Published on
Updated on

Kalaburagi gold robbery

कलबुर्गी (कर्नाटक): एक प्लेट पावभाजीने संपूर्ण चोरीच्या प्रकरणाचा उलगडा केला, हे ऐकून कोणीही आश्चर्यचकित होईल! कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका दागिन्यांच्या दुकानात भरदिवसा झालेल्या मोठ्या चोरीचा तपास चविष्ट पावभाजीच्या माध्यमातून लागला आणि पोलिसांनी तब्बल 2.15 कोटी रुपये किंमतीचं सोनं हस्तगत केलं.

चोरीचा कट व 'प्लॅनिंग'

11 जुलै रोजी आयोध्या प्रसाद चौहान (48), फारुख अहमद मलिक (40), आणि सोहेल शेख ऊर्फ बादशाह यांनी एकत्र येऊन मारथुल्ला मलिक यांच्या दागिन्यांच्या दुकानावर डल्ला मारण्याची योजना आखली. त्यांच्या सोबत एका स्थानिक गुन्हेगाराचाही सहभाग होता, ज्याचा शोध पोलिस अजून घेत आहेत.

फारुख या चोरीचा सूत्रधार होता. त्याचा स्वतःचा सुवर्णकार व्यवसाय तोट्यात गेला होता आणि त्याच्यावर 40 लाख रुपयांचं कर्ज होतं. त्यातूनच त्याने हा धाडसी निर्णय घेतल्याचं उघड झालं.

pavbhaji | gold theif arrest
Varsha Gaikwad on Nishikant Dubey | निशिकांत दुबे यांना संसदेच्या लॉबीत मराठी खासदारांनी घेरले; अखेर दुबे म्हणाले- 'जय महाराष्ट्र'

चोरीची घटना

चोरीच्या दिवशी, फारुखने दुकानाबाहेर उभं राहून लक्ष ठेवण्याचं काम केलं, तर इतर तीन जणांनी बंदुका घेऊन दुकानात प्रवेश केला. दुकानदाराची हात-पाय दोरीने बांधून त्यांनी लॉकर उघडला आणि दागिने व रोख रक्कम घेऊन पळाले.

सुरुवातीला दुकानदाराने फक्त 805 ग्रॅम सोने चोरी झाल्याचं सांगितलं, परंतु पोलिसी चौकशीत पुढे उघड झालं की प्रत्यक्षात 3 किलो सोनं चोरीला गेलं होतं. दुकानदाराकडूनच चोरीच्या प्रमाणात खोटं सांगितलं गेलं होतं, ही बाब पोलिसांनी गंभीरतेने घेतली आहे.

पावभाजीमुळे लागला छडा

या कथेत सगळ्यात वेगळं व नाट्यमय वळण आलं ते फारुखच्या पावभाजीच्या क्रेव्हिंगमुळे. चोरीनंतर लगेच न पळता, फारुख जवळच्याच एका ठेल्यावर थांबून फक्त 30 रुपयांची पावभाजी खाण्यास गेला. त्याचं सीसीटीव्ही फुटेज जवळच्या दुकानांनी पोलिसांना दिलं.

महत्वाची बाब म्हणजे त्याने पैसे PhonePe द्वारे भरले. याच डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून पोलिसांना त्याचा मोबाईल नंबर मिळाला आणि तिथून तपास सुस्पष्टपणे पुढे सरकला.

pavbhaji | gold theif arrest
Al Qaeda terrorist arrest | गुजरातमध्ये अल-कायदाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; ‘ऑटो-डिलीट’ अ‍ॅप्सद्वारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

काय मिळालं पोलिसांना?

पोलिसांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली आणि 2.865 किलो सोनं व 4.80 लाख रुपये रोख जप्त केले. चोरीला गेलेलं सोनं काही प्रमाणात वितळवण्यात आलं होतं.

त्याचबरोबर, दुकानदार मारथुल्ला मलिक याच्यावरही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे कारण त्याने सुरुवातीला चोरीच्या प्रमाणात माहिती लपवली होती.

कलबुर्गी पोलीस आयुक्त एस. डी. शरणप्पा यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यात मोठं यश मिळवलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news