Indore Water Tragedy Kailash Vijayvargiya: कैलाश विजयवर्गीय यांचं वादग्रस्त 'घंटा' वक्तव्य सरकारी अहवालात लिहिलं... SDM डायरेक्ट निलंबित

\Kailash Vijayvargiya
Indore Water Tragedy Kailash Vijayvargiyapuhari photo
Published on
Updated on

Indore Water Contamination Tragedy Kailash Vijayvargiya: मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी इंदोर विषारी पाणी पुरवठा प्रकरणात माध्यम प्रतिनिधीशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केला होता. त्यामुळे ते सध्या देशभर चर्चेत आले आहेत. त्यातच आता 'घंटा' या वक्तव्यावरून देवासचे एसडीएम आनंद मावलीय यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी एका सरकारी आदेशात वादग्रस्त 'घंटा' वक्तव्याच्या उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

\Kailash Vijayvargiya
Indore: हृदय पिळवटून टाकणारी घटना! 10 वर्ष नवस केल्यानंतर झालं होतं बाळ; दूषित पाण्याने घेतला 6 महिन्याच्या चिमुकल्याचा जीव

आदेशानंतर कारवाई

उजैनचे संभाग आयुक्त आशिष सिंह यांनी या कारवाईचा आदेश जारी केला आहे. एसडीएम कार्यालयात ग्रेड ३ कर्मचारी अमित चौहान यांना देखील जिल्हाधिकारी ऋतुराज सिंह यांनी निलंबीत केलं आहे. आता प्रशासकीय बदल करत अभिषेक शर्मा यांना देवासचे नवे एसडीएम नियुक्त केलं गेलं आहे.

\Kailash Vijayvargiya
Indore Water Contamination: पोलीस ठाण्याजवळील शौचालयातील 'विषारी घाण' पिण्याच्या पाण्यात मिसळली... ९ जणांचा मृत्यू; १४०० लोकं प्रभवित

आक्षेपार्ह वक्तव्यानंतर गदारोळ

इंदौरमध्ये पिण्याच्या दुषित पाणी पुरवठ्यामुळं अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर राजकीय आरोपाच्या फैरी झडत असताना मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना घंटा या शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर पत्रकाराने देखील योग्य भाषेचा प्रयोग करा असं वर्गीय यांना सुनावलं होतं.

दरम्यान, यावरून काँग्रेस कैलाष विजयवर्गीय यांना घेरत असतानाच देवासच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या एसडीएम आनंद मावलवीय यांनी एक सरकारी आदेश जारी केला होता. हा आदेश काँग्रेसच्या प्रस्तावित विरोध प्रदर्शनादरम्यान शांतता राखण्यात यावी यासाठी काढण्यात आला होता. मात्र या आदेशातील भाषेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

\Kailash Vijayvargiya
BEST Bus Manifesto Congress: बेस्ट मुंबई महापालिकेच्या निधीतून चालवणार; काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर

काँग्रेसह सत्ताधारी देखील नाराज

व्हायरल व्हिडिओमध्ये प्रशासकीय आदेशाच्या सोबत काँग्रेसची जाहिरात, सरकार विरोधी आदेश, मृतांची संख्या आणि मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या घंटा वक्तव्याचा थेट उल्लेख करण्यात आला होता. सामान्यपणे सरकारी आदेशात केवळ कायदा आणि सुव्यवस्था, पोलीस तैनाती आणि प्रशासकीय आदेश यांचा समावेश असतो.

मात्र या आदेशात काँग्रेसची जाहिरात शब्दशः घेतली होती. यामुळे प्रशासनाने यावर आक्षेप घेतला. हा आदेश सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर विरोधी पक्षाने प्रशासनाचं कसं राजकीयकरण झालं आहे याचं हे उदाहरण असल्याची टीका केली. या आदेशावर सत्ताधारी देखील अस्वस्थ होते. त्यानंतर उच्च स्तरावरून ही करावाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news