Summer wedding : उन्हाळ्यातलं लग्न, त्‍यात भर दुपारची वरात, पाहुन तुम्हालाही फुटेल घाम (Video)

या वरातीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
Summer wedding
Summer wedding : उन्हाळ्यातलं लग्न, त्‍यात भर दुपारची वरात, पाहुन तुम्हालाही फुटेल घामfile photo
Published on
Updated on

just looking at this wedding procession is enough to make you break a sweat watch viral video

पुढारी ऑनलाईन :

एका वरातीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. चला, नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.

Summer wedding
काळजाच्या तुकड्यासाठी आई जंगलच्या राजाशी भिडली, तिचा रूद्रावतार पाहून सिंहाने धूम ठोकली (व्हिडिओ व्हायरल)

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, काही सांगता येत नाही. दररोज लोक अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करतात, आणि त्यापैकी जे वेगळे किंवा लक्ष वेधून घेणारे असतात ते लगेच व्हायरल होतात. तुम्हीही सोशल मीडियावर असालच आणि तुमच्या फीडवर दररोज असे अनेक व्हायरल कंटेंट येत असतील, ज्यावर तुम्ही प्रतिक्रिया देत असाल. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चला तर मग, त्या व्हिडिओमध्ये काय दिसतं ते पाहूया.

भर दुपारी निघालेल्या वरातीचा व्हिडिओ व्हायरल

सध्या उकाड्याने लोकांची अवस्था काय झाली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडायलाही लोक घाबरत आहेत. अशा परिस्थितीत एक वरात भर उन्हात निघाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून त्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये वरात रात्री नव्हे तर दिवसा निघालेली दिसते. कडक उन्हात वरात भर ट्रॅफिकमधून वाट काढत पुढे जात आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

Summer wedding
Real Snakes and Ladders | महिलेने घरात खेळली खरीखुरी ‘साप-शिडी’!

यात विशेष म्हणजे या वरातीतील लोकांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मोठे कूलरही वरातीसोबत चालत आहेत असे दिसते. पण इतक्या उकाड्यात कूलरची हवा सुद्धा गरमच वाटत असणार हे वेगळे सांगायला नको.

व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @jadiarahul या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “गर्मी की शादी वो भी दिन की बारात, तूफानी लोग हैं.” या व्हिडिओला 27 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत :

एका यूजरने लिहिले, “काय जमाना आला आहे!”

दुसऱ्याने म्हटले, “खूप क्रिएटिव लोक आहेत.”

तिसऱ्याने प्रतिक्रिया दिली, “फक्त विचार केला तरी घाम फुटतो.”

आणखी एका यूजरने सुचवले, “वरात संध्याकाळी काढली असती तर बरं झालं असतं.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news