High Court Slams : ‘...तर केवळ देवच देशाला वाचवू शकतो’; 'कर्तव्य' टाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर हायकोर्टाचे ताशेरे

पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्‍च न्‍यायालयाने फेटाळली
High Court on Police Duty Terror Threat
Published on
Updated on

High Court on Police Duty Terror Threat : "दहशतवाद्यांच्या धमक्यांना घाबरून कोणत्याही दर्जाचा पोलीस अधिकारी जर कर्तव्य बजावण्यास नकार देत असेल, तर केवळ देवच या देशाला वाचवू शकतो," असे ताशेरे ओढत जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने एका पोलीस कर्मचाऱ्याची पुनर्नियुक्तीची याचिका फेटाळून लावली आहे.

दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकीनंतर कर्तव्‍य टाळले

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, पोलीस अधिकारी (SPO) हेमो हामिद वानी यांची २०१२ मध्ये विशेष सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. २०१५ मध्ये त्यांची नियुक्ती दक्षिण काश्मीरमधील शोपियान येथील रेशीपोरा येथे करण्यात आली होती. यादरम्यान वैद्यकीय रजेवर असताना त्यांना दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली, ज्यामुळे ते कर्तव्यावर परतले नाहीत. काही काळानंतर जेव्हा ते पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना परवानगी नाकारण्यात आली. यामुळे वानी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तिथेही काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये न्यायालयाने जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना (DGP) यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महासंचालकांनी त्यांची याचिका फेटाळल्याने वानी यांनी पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

High Court on Police Duty Terror Threat
SUPREME COURT : खासगी रुग्णालयांच्या मनमानी दरांना बसणार चाप? उपचारांच्या दरमर्यादेचा नियम वैध; केंद्राचे प्रतिज्ञापत्र

काय केली होती पोलीस अधिकार्‍याने मागणी?

आपल्या याचिकेत वानी यांनी दावा केला होता की, जम्मू-काश्मीर पोलिसांनी कोणतीही चौकशी, औपचारिक आरोप किंवा सुनावणी न घेता त्यांना सेवेतून काढून टाकले. ही कारवाई संविधानाचे कलम १६ (रोजगाराची समान संधी), २१ (जीवनाचा आणि उपजीविकेचा अधिकार) आणि ३११ (अन्यायकारक हकालपट्टीपासून संरक्षण) यासह पोलीस नियमांचे उल्लंघन करणारी आहे.

High Court on Police Duty Terror Threat
High Court Fatwa Ruling : मुस्लिम पती केवळ 'फतव्या'च्या आधारे घटस्फोटाची घोषणा करू शकत नाही : हायकोर्ट

कर्तव्‍यावर गैरहजर राहण्‍याचे कारण स्‍वीकारार्ह नाही

न्यायमूर्ती संजय धर यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणी आदेश देताना स्पष्ट केले की, 'एखाद्या भागात शांतता राखण्यासाठी तैनात असलेले नियमित पोलीस दल अपुरे पडते, तेव्हाच विशेष उद्देशासाठी स्थानिक लोकांची SPO म्हणून नियुक्ती केली जाते. त्यामुळे ही नियुक्ती कायमस्वरूपी नसून विशिष्ट आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी असते.याचिकाकर्त्याने कर्तव्यावर गैरहजर राहण्यासाठी दिलेले कारण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. विशेष पोलीस अधिकारी (SPO) हेमो हामिद वानी यांनी पोलीस कायद्यांतर्गत सामान्य पोलिसांप्रमाणे अधिकार, विशेषाधिकार आणि सुरक्षा मिळण्याचा दावा केला होता, न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news