

Crime News Jhansi First Female Auto Driver Murder: हौस म्हणून नाही तर कुटुंबाचं पोट भरण्यासाठी अनिता चौधरी यांनी पुरूषांची मक्तेदारी असलेल्या रिक्षाचालक व्यवसायात पाऊल ठेवलं. पाऊल ठेवताच त्यांनी इतिहास रचला. त्या राणी लक्ष्मीबाईंच्या झाशीमधील पहिल्या महिला रिक्षाचालक बनल्या. मात्र झाशीमधील या पहिल्या महिला रिक्षाचालक अनिता यांचा भयावह अंत झाला आहे. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
४ जानेवारी २०२६ रविवारी झाशी पोलिसांनी रात्री अडीच वाजता एक कॉल आला होता. कॉलमध्ये स्टेशन रोर्डवर एका ऑटो रिक्षाचा अपघात झाल्याचे सांगण्यात आलं. त्यात एक महिला गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठलं.
त्यावेळी त्यांना एक ऑटो रिक्षा उलटी पडलेली दिसली. रिक्षाची काच फुटली होती. त्याच्या शेजारी रक्ताच्या थारोळ्यात एक महिला पडली होती. ज्यावेळी पोलिसांनी या महिलेला उचलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना धक्काच बसला. ही महिला दुसरी तिसरी कोण नसून झाशीची पहिली महिला ऑटो रिक्षा ड्रायव्हर अनिता चौधरी होती.
ऑटोच्या खाली दबल्यामुळं अनिताचा मृत्यू झाला होता. तिचे शरीर थंड पडले होते. पोलिसांनी त्वरित अनिता यांना उचललं अन् डॉक्टरांकडे नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. झाशीच्या पहिल्या महिला रिक्षा चालक अनिता यांचा असा धक्कादायक मृत्यू झाला होता.
इंग्रजांशी दोन हात करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या झाशीमध्ये अशी घटना घडल्यानं संपूर्ण शहर सुन्न होतं. पोलिसांना देखील मोठा धक्का बसला होता. कारण ज्यावेळी अनिता यांचे शवविच्छेदन करण्यात आलं त्यावेळी अनिता यांचा दुर्दैवी अपघाची मृत्यू नसून ती एक मर्डर मिस्ट्री आहे हे उघड झालं.
सुरूवातीला अनिता चौधरी या ऑटो चालवत नव्हत्या तर एका कंपनीत नोकरी करत होत्या. मात्र तब्बल १५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांची २०२० मध्ये त्यांच्या सुपरवायजरसोबत वादावादी झाली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली अन् झाशीमधून त्या महाराष्ट्रात आल्या. मात्र कोरोना काळात लॉकडाऊन लागलं त्यांना घरी परतावं लागलं. तो अत्यंत कठिण काळ होता. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी अनिता यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
मात्र अनिता यांच्या या निर्णयाला समाजानं तर विरोध केलाच मात्र अनिता यांच्या पतीनं देखील याला विरोध केला. त्यांनी कर्ज मिळवण्यासाठी अनिता यांना कोणतीच मदत केली नाही. मात्र अनिता यांनी प्रयत्न करून नवी ऑटो रिक्षा खरेदी केली. त्यानंतर त्यांनी त्या रिक्षा चालवायला देखील शिकल्या. त्यावेळी शहरातील पहिली महिला रिक्षा चालक म्हणून त्यांचा गौरव देखील झाला. त्यांच्याकडे पाहून अनेक महिलांनी ऑटोरिक्षा ई रिक्षा चालकाच्या पेशात पाऊल ठेवलं.
मात्र हीच ऐतिहासिक गोष्ट अनिता चौधरी यांच्या जीवावर उठली. आता जाणून घेऊयात त्या रात्री काय झालं.... सुरूवातीला अनिता चौधरी यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र ज्यावेळी शवविच्छेदन झालं त्यावेळी अनिता यांच्या मृत्यूची खरी कहानी समोर आली. अनिता यांचा अपघात नाही तर खून झाला होता.
डॉक्टरांना अनिता चौधरी यांच्या गळ्याजवळ एक बंदुकीची गोळी अडकलेली दिसली. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्याकानपट्टीवर गोळी मारण्यात आली होती. अनिता यांच्या अंगावरील मंगळसुत्रासह सर्व दागिने गायब होते. पोलिसांनी या खूनाचा तपास सुरू केला.
पोलिसांना अनिता चौधरी मर्डर मिस्ट्रीमधील पहिले इनपूट हे त्यांच्या घरच्यांकडूनच मिळाले. अनिताच्या कुटुंबियांनी या खूनाचा सरळ आरोप एका व्यक्तीवर लावला. या व्यक्तीचं नाव मुकेश असं होतं. मुकेश हा अनिताचा जुना ओळखीतला व्यक्ती होता. ते काही काळ एकत्र देखील राहिले होते. मात्र पुढं अनिता आणि मुकेश यांचे ब्रेकअप झाले. ते वेगवेगळे राहू लागले.
कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून देखील वाद होता. मुकेश सतत अनिता यांचा पाठलाग करत असायचा. तो अनिताला त्याच्यासोबत राहण्यास सांगत होता. अनिता याला तयार नव्हती. मुकेशने आधीच अनिता यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर मुकेश फरार असून त्याचा तपास सुरू आहे. मात्र झाशीच्या पहिल्या महिला रिक्षा चालक अनिता यांच्या मर्डरची चर्चा देशभरात सुरू आहे.