

अशा प्रकारचे कृत्य करणारे माणूस असू शकत नाहीत; ते राक्षस आहेत आणि त्यांना सर्वात कठोर शिक्षा व्हायलाच हवी," अशी मागणी मृत चिमुरडीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना केली.
gang rape accused confession crime
मेरठ : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून, तिच्यावर २० वर्षांच्या दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. यानंतर अपघात वाटावा म्हणून तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. दोघा नराधमांच्या क्रौर्याच्या निर्लज्ज कबुलीने पोलीसही हादरले.
या अमानुष घटनेबाबत 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले की, शुक्रवारी (२ जानेवारी) एका कारखान्यात मजूर म्हणून काम करणारे दोन २० वर्षांचे तरुणांनी दारू ढोसली. यावेळी एकाने परिसरात अनेक लहान मुली राहतात असे सांगितले. आपण मजेसाठी कोणाचेही अपहरण करू शकतो, असा कट रचत दोघेही मुलीच्या शोधात बाहेर पडले. एका घराबाहेर पाच वर्षांची चिमुकली खेळत होती. या दोघांनी तिचे अपहरण केले.
आरोपींना मुलीच्या वडिलांच्या एका मित्राने तिला आरोपींसोबत पाहिले होते. नंतर तिच्या आईला मुलीची चप्पल त्या दोन आरोपींच्या भाड्याच्या खोलीत सापडली. तिने त्यांना जाब विचारल्यावर दोघेही पळून गेले. मुलगी इमारतीच्या मागे बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेची उत्तर प्रदेश पोलिसांनी गंभीर दखल घेतली. तात्काळ तीन पोलीस पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत दोन आरोपी होते. यावेळी चकमकीत दोघांच्या पायांना गोळ्या लागल्या. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.
आम्ही दोघेही भाड्याने राहत असलेल्या खोलीत दारू पिली. यानंतर केवळ 'मजेसाठी' इमारतीमधीलच लहान मुलीच्या अपहरणाचा कट रचला. त्यांनी चिमुकलीचे अपहरण केले. यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून तिला तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची निर्लज्ज कबुली नराधमांनी दिल्यानंतर पोलीसही हादरले.
पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नराधमांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७० (२) (सामूहिक बलात्कार) आणि १०३ (१) (खून), तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ५एम/६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "दोन्ही तरुण सुमारे आठ महिन्यांपासून आपल्या कुटुंबासह त्या इमारतीत भाड्याने राहत होते. ते आम्हाला ओळखत होते. एका पाच वर्षांच्या मुलीसोबत असे करतील याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. अशा प्रकारचे कृत्य करणारे माणूस असू शकत नाहीत; ते राक्षस आहेत आणि त्यांना सर्वात कठोर शिक्षा व्हायलाच हवी," अशी मागणी मृत चिमुरडीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना केली.