Inemuri : शाळेत जेवणानंतर विद्यार्थ्यांना झोपण्याची मुभा, कारण ऐकूण व्हाल थक्क!

25 मिनिटांची झोप वाढवते फोकस! ‘इनेमुरी’ पद्धत जगभर चर्चेत, भारतात मात्र समजतात चुकीचे...
Inemuri News
Inemuri : शाळेत जेवणानंतर विद्यार्थ्यांना झोपण्याची मुभा, कारण ऐकूण व्हाल थक्क!file photo
Published on
Updated on

japan school give student time to sleep after lunch for better results

पुढारी ऑनलाईन :

शाळेत चिमुकल्यांना अभ्यासादरम्यान खूप झोप येते. त्‍यात ते बसूनच पेंगत असल्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. मात्र यामुळे विद्यार्थ्यांसाठी झोप येउनही अभ्यासाला बसणे किती कठीण असते हे समजून घेणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी शाळेचे नियम विद्यार्थ्यांसाठी चांगलेच पोषण बनवण्यात आले आहेत.

Inemuri News
Zombie drug danger | झोम्बी ड्रगचा धोकादायक विळखा

जपानमधील ‘इनेमुरी’ ही परंपरा म्हणजे एक खास प्रकारची मायक्रो-नॅप (थोड्या वेळेची झोप) आहे, जी मुलांना आराम मिळवून देण्यास मदत करते. जपानमध्ये चांगली झोप शरीर आणि मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे अनेक शाळा, महाविद्यालये आणि अगदी कार्यालयांमध्येही कामाच्या दरम्यान थोडा वेळ विश्रांती घेणे किंवा डुलकी काढणे आवश्यक मानले जाते.

प्रत्येक देशाची शिक्षणपद्धती वेगळी असते. काही देशांमधील शिक्षणव्यवस्था इतकी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते की त्याबद्दल ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. काही शाळांमध्ये मुलांना जड दप्तर नेण्यास बंदी असते, तर काही ठिकाणी लहानपणापासून शिस्त, आत्मनिर्भरता आणि उत्तम जीवनशैलीचे धडे दिले जातात. मात्र काही शाळांमध्ये दुपारच्या जेवणाच्या सुट्टीसोबत थोडा वेळ झोप घेण्याचीही मुभा दिली जाते.

Inemuri News
Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? मग 'जेवणावर द्वेष नको, प्रेम करा!'; तज्ज्ञ काय सांगतात?

यामुळे विद्यार्थ्यांना ताजेतवाने वाटते आणि अभ्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करता येते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

जपानमध्ये शाळांमध्ये मिळतो विश्रांतीचा वेळ

जपानमध्ये झोप ही शरीर आणि मेंदूला ताजेतवाने ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच अनेक शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी खास वेळ दिला जातो. अहवालानुसार, 20 ते 40 मिनिटांची विश्रांती घेतल्यास मेंदू पुन्हा सक्रिय होतो आणि काम किंवा अभ्यास अधिक लक्षपूर्वक करता येतो. या पद्धतीला ‘इनेमुरी’ असे म्हटले जाते.

भारतात मात्र ही सवय मानली जाते चुकीची

भारतात जर एखादे मूल शाळेत झोपलेले आढळले, तर ती अतिशय चुकीची सवय मानली जाते. मात्र जपानमध्ये याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. आता हा ट्रेंड इतर अनेक देशांमध्येही पसरत असून लोक त्याचे फायदे समजून घेऊन त्याला प्रोत्साहन देत आहेत.

किती वेळ झोप घ्यावी?

यासाठी कोणतीही ठरावीक मर्यादा नाही. प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार डुलकी घेतो. एका अभ्यासानुसार, 25 मिनिटांची झोप घेतल्याने काम करण्याची क्षमता सुमारे 34 टक्क्यांनी वाढते. तज्ज्ञांच्या मते, 10 ते 25 मिनिटांची डुलकी सर्वाधिक फायदेशीर ठरते.

दीर्घकाळ काम केल्यामुळे शरीर थकते. अशा वेळी छोटीशी झोप शरीर आणि मेंदूला पुन्हा ताजेतवाने करण्यास मदत करते. त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते, चुका कमी होतात आणि कामात अधिक उत्साह निर्माण होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news