ACP Vivek Bhagat Promotion: जंतर मंतर आंदोलनादरम्यान महिलांचे शोषण... ACP विवेक भगत यांचे प्रमोशन थांबवलं

एसीपी विवेक भगत यांच्यावर दोन महिला पत्रकारांचे शोषण केल्याचा आरोप आहे.
ACP Vivek Bhagat Promotion
ACP Vivek Bhagat PromotionPUDHARI
Published on: 
Updated on: 

ACP Vivek Bhagat Promotion: दिल्ली सरकारने १२ सिलेक्शन ग्रेड DANIPS अधिकाऱ्यांना अतिरिक्त पोलीस उपायुक्त अर्थात अॅडिशनल डीसीपी चार्ज देण्याबाबतच्या आदेशात बदल केला आहे. या सुधारित आदेशात दिल्ली पोलीसमधील एसीपी विवेक भगत यांचा देखील समावेश असून त्यांचा देखील अतिरिक्त चार्ज हटवण्यात आला आहे.

एसीपी विवेक भगत यांच्यावर दोन महिला पत्रकारांचे शोषण केल्याचा आरोप आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरूद्ध जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावेळी हा प्रकार घडला होता. सरकारने सांगितलं की विवेक भगत यांनी स्वतः या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना अतिरिक्त चार्ज नको आहे.

ACP Vivek Bhagat Promotion
Jantar Mantar Protest CEC Resignation: गांधी जयंतीलाच जंतर-मंतरवर आंदोलकांची उचला उचली; ५०० जणांना घेतलं ताब्यात, इंटरनेट बंद

तपास पूर्ण होईपर्यंत...

दिल्ली सरकारने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून रात्री एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये दिल्ली अंदमान निकोबार द्वीप समुह पोलीस सेवा मधील १२ अधिकाऱ्यांचे एडीसीपी पदाचा कार्यभार सोपवण्यासंबंधीचे ५ ऑक्टोबरचे आदेशात विवेक भगत यांच्या संदर्भात सुधारणा करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा २५ ऑगस्टचा प्रस्ताव हा या घटनाक्रमाच्या आधीचा आहे. हा आदेश ५ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला होता.

पोस्टमध्ये वर्तमान कार्यभार सोपवणे ही एक अस्थायी व्यवस्था होती. यातून काही वित्तीय लाभ होत नाही. याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांना एडीसीपी चा कार्यभार सोपवला होता. ते नियमित स्वरूपात नियुक्त एडीसीपींकडून केली जाणारी वैधानिक कर्तव्ये पार पाडू शकत नाही.

ACP Vivek Bhagat Promotion
Jantar Mantar Protest | जंतर-मंतर आंदोलनामध्ये पोलिसांनी इलेक्ट्रिक शॉक उपकरणे, पेलेट गनचा अतिवापर केला, 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'चा अहवाल!

या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे की विवेक भगत यांनी स्वतः महिला पत्रकारांच्या कथित शोषण प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर, त्याचा समाधानकारक निष्कर्ष येईपर्यंत ते वर्तमान कार्यभार स्वीकारणार नाहीत. त्यानंतर ५ ऑक्टोबरच्या आदेशात सुधारणा करण्यात आली. आता वर्तमान कार्यभार सोपवण्याबाबत उर्वरित ११ अधिकाऱ्यांबाबत पुन्हा आदेश पारीत केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news