जम्मू-काश्मिर; कुपवाडमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार, एक जवान जखमी

२४ तासांतील ही दुसरी चकमक
Jammu-Kashmir
जम्मू-काश्मिर; कुपवाडमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार, एक जवान जखमीRepresentive Imges
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे आज (दि.२४) भारतीय लष्कराच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. तर एक जवान जखमी झाला आहे. काश्मीरमध्ये २४ तासांतील ही दुसरी चकमक आहे. (Jammu-Kashmir)

२४ तासांतील ही दुसरी चकमक

काही दिवसांपूर्वी कुपवाडा येथील कोवुत भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने जम्मू-काश्मीर पोलिसांसह संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. दरम्यान कुपवाडा  येथे आज (दि.२४) भारतीय लष्कराच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. आणि एक जवान जखमी झाला आहे. काश्मीरमध्ये २४ तासांतील ही दुसरी चकमक आहे. 

१ दहशतवादी ठार, एक जवान जखमी

आज जवानांनी  संशयास्पद हालचाल लक्षात येताच जवान आणि दहशतवादी यांच्यात अंदाधुंद गोळीबार झाला. त्यानंतरच्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आणि एक जवान जखमी झाला. ऑपरेशन सुरू असल्याचे असे लष्कराने सांगितले. या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news