Daughter Killed Mother Gov Job: जयपूरमधील प्रकरणाला वेगळं वळण... सरकारी नोकरीसाठी आईचीच नाही तर वडिलांचीही केली होती हत्या?

Daughter Killed Mother Gov Job
Daughter Killed Mother Gov Jobpudhari
Published on
Updated on

Daughter Killed Mother Gov. Job: जयपूरमधील लॉ स्टुडंटला तिच्या आईची सरकारी नोकरी आपल्याला मिळावी म्हणून आईचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. जयपूरमधील २३ वर्षाच्या आयुषी शर्माने तिची आई नीरज शर्माचा सुपारी देऊन खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिला अटक देखील केली आहे. आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून आयुषीने आपल्या वडिलांचा देखील अशाच प्रकारे काटा काढला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Daughter Killed Mother Gov Job
Daughter kills Mother for gov Job: लाडकीच निघाली कातील! फक्त 'सरकारी' नोकरीसाठी पोटच्या मुलीनं आईलाच सुपारी देऊन उडवलं

आयुषीच्या मामांनी आयुषीने गेल्या वर्षी तिच्या वडिलांचा देखील खून केला असावा असा आरोप केला आहे. जयपूर कोर्टात क्लार्क म्हणून काम करणाऱ्या विजय शर्मा यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी नीरज शर्मा यांना अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी लागली होती. विजय शर्मा यांचा गेल्या वर्षी दीर्घ आजारामुळं मृत्यू झाला होता.

त्यानंतर ३ जून रोजी जयपूरमध्ये नीरज शर्मा यांना एसयुव्हीने उडवलं होतं. पोलीस तपासात मुलीनेच सुपारी देऊन आपल्या आईलचा उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Daughter Killed Mother Gov Job
Crime News : तिरुपती हादरले! लग्नावेळी नातेवाईकांमध्‍येच वाद; भररस्त्यात डबल मर्डर

आयुषी ही एलएलबीच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिने आईला मारण्यासाठी काँट्रॅक्ट किलरला सुपरा दिली होती. यात तिला तिच्या चुलत भावाने बलरामने मदत केली होती. आईचा मृत्यू हा रस्ते अपघातात झाल्याचं दाखवून तिची सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न आयुषी करत होती असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

आता आयुषीचे मामा मृत नीरज शर्मा यांचे भाऊ राकेश शर्मा यांनी आयुषीने तिच्या वडिलांचा देखील खून केल्याची शक्यता असल्याचा आरोप केला. राकेश शर्मा म्हणाले की, आयुषी आणि तिच्या चुलत भावाने बलरामने आयुषीच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर एका अनोळखी रूग्णालयात हलवले होतं. याबाबत कुटुंबाला अंधारात ठेवण्यात आलं होतं. जवळपास तीन महिने कुटुंबाला त्यांच्या उपचारांबाबत अंधारात ठेवण्यात आलं.

Daughter Killed Mother Gov Job
Crime News: प्रेयसीसोबतच्या डिलीट चॅटने गुपित उघड; पत्नीच्या हत्येप्रकरणी तेलंगणातील इंजिनिअरला अमेरिकन पोलिसांनी कसं पकडलं?

आईने ज्यावेळी आयुषीला याबाबत सतत प्रश्न विचारले त्यावेळी आयुषीने सांगितलं की तिच्या वडिलांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर कुटुंबीयांनी विजय शर्मा यांना घरी आणलं. मात्र डॉक्टरांनी त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याचे सांगितलं होतं.

मामांनी आयुषीने तिच्या वडिलांची फिडिंग ट्यूब देखील काढून टाकल्याचा आरोप केला. यामुळेच आयुषीच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा देखील दावा आयुषीच्या मामांनी केला आहे. पोलीस आता मामांनी केलेल्या दाव्याची चौकशी करत आहेत. ते आयुषीला याबाबत विचारणा करत आहेत. आयुषी सध्या पोलीस कोठडीत आहे.

Daughter Killed Mother Gov Job
Sambhajinagar Crime News : पत्नीवरून शिवीगाळीचा वाद; मित्राचा खून, तिघे अटकेत

पोलीस आयुषीचा चुलत भाऊ बलरामचा देखील तपास करत असून तो या गुन्ह्यातील सहआरोपी आहे. पोलिसांमधील सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे, आयुषी, बलराम आणि बलरामचे वडील मोहन हे नीरज शर्मा खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी आहेत. हे तिघांमध्ये आयुषीच्या वडिलांची संपत्ती वाटून घ्याची असं ठरलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news