ITR Return : ITR-2 फॉर्म आधी भरलेल्या माहितीसह ऑनलाइन भरण्यास सुरू, जाणून घ्या कोणी भरावा हा फॉर्म?

how to file ITR-2 online : ITR-2 फॉर्म प्री-फिल्ड माहितीसह ऑनलाइन भरण्यास सुरूवात झाली आहे. जाणून घ्या मुदत आणि सविस्तर माहीती...
ITR-2 online filing 2025
ITR-2 online filing 2025 file photo
Published on
Updated on

ITR-2 online filing 2025

नवी दिल्ली : आयकर विभागाने आजपासून (दि. १८) आयटीआर-२ (ITR-2) फॉर्म ऑनलाइन दाखल करण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे पगारदार व्यक्तींसोबतच ज्या करदात्यांना भांडवली नफा (capital gains), क्रिप्टोमधून उत्पन्न किंवा इतर प्रकारचे उत्पन्न आहे, ते आता ई-फायलिंग पोर्टलवर आपले आयकर विवरणपत्र (ITR) ऑनलाइन दाखल करू शकणार आहेत.

आर्थिक वर्ष २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) साठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, केवळ ITR-1 आणि ITR-4 फॉर्म ऑनलाइन आणि एक्सेल युटिलिटीद्वारे उपलब्ध होते, ज्यामुळे ठराविक उत्पन्न गटातील करदातेच आपले विवरणपत्र भरू शकत होते. दरम्यान, ITR-3 साठी फक्त एक्सेल युटिलिटी उपलब्ध करून देण्यात आली असून, ऑनलाइन सुविधा अद्याप सुरू झालेली नाही.

आयकर विभागाने 'एक्स' वर माहिती दिली आहे. करदात्यांसाठी महत्त्वाची सूचना असल्याचे सांगत ITR-2 फॉर्म आता ई-फायलिंग पोर्टलवर प्री-फिल्ड डेटासह ऑनलाइन भरण्यासाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. तसेच https://incometax.gov.in/iec/foportal/ या संकेतस्थळाला भेट द्या असे म्हटले आहे.

ITR-2 online filing 2025
ITR म्हणजे काय? कोण भरू शकते? का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

कोण ITR-2 भरू शकतो?

Tax2Win चे सह-संस्थापक चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक सोनी यांच्या मते, खालील व्यक्तींनी ITR-2 फॉर्म भरावा :

  • पगार किंवा पेन्शनमधून उत्पन्न असलेले

  • एका किंवा अधिक घरमालमत्तेचे उत्पन्न असलेले

  • लॉटरी, घोड्याच्या शर्यतीतून उत्पन्न किंवा विशेष कर दर लागू होणारे उत्पन्न

  • नॉन-लिस्टेड शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली व्यक्ती

  • कंपनीमध्ये संचालक असलेली व्यक्ती

  • रिझिडेंट किंवा नॉन-रिझिडेंट करदाते

  • भांडवली नफा (Capital Gains) असलेले उत्पन्न

  • परदेशी मालमत्ता किंवा उत्पन्न असलेले

  • ₹5,000 पेक्षा जास्त शेती उत्पन्न

  • क्लबिंग प्रोव्हिजन लागू होणारे उत्पन्न

  • भारताबाहेरील बँक खात्यांवर साइनिंग अथॉरिटी असलेली व्यक्ती

  • घरमालमत्तेतील तोटा पुढील वर्षासाठी जतन करू इच्छिणारे

  • कलम 194N अंतर्गत कर वजावट झालेली व्यक्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news