Cigarette Price Hike: आता सिगारेटही महागली; एका पाकिटासाठी मोजावे लागणार इतके रुपये, काय आहे दरवाढीमागचं कारण?

Gold Flake Premium Cigarette Price: ITC कंपनीने Gold Flake Premium सिगारेटच्या १० नगांच्या पाकिटाची किंमत १२५ रुपयांवरून १३५ रुपये केली आहे.
Gold Flake Premium Cigarette Price
Gold Flake Premium Cigarette PricePudhari
Published on: 
Updated on: 

Gold Flake Premium Cigarette Price: सिगारेट ओढणाऱ्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे. ITC कंपनीने आपल्या लोकप्रिय Gold Flake Premium या सिगारेटच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. कंपनीने एका पाकिटामागे १० रुपयांची दरवाढ केली आहे. त्यामुळे १० सिगारेट असलेल्या एका पाकिटाची किंमत १२५ रुपयांवरून थेट १३५ रुपये झाली आहे. म्हणजेच सिगारेटच्या किमतीत जवळपास ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, एका वर्षात कंपनीने दुसऱ्यांदा या ब्रँडच्या किमती वाढवल्या आहेत.

नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यापासून नवीन दर लागू

ITC ने Gold Flake Premium च्या रेग्युलर साइज फिल्टर सिगारेटच्या (RSFT) किमती वाढवल्या आहेत. या प्रकारातील सिगारेटची लांबी ६० ते ७० मिलिमीटर असते. नवीन दर असलेली पाकिटे नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यापर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे.

यापूर्वी जून २०२६ मध्येही कंपनीने या सिगारेटच्या किमतीत १० रुपयांची वाढ केली होती. त्यावेळी एका पाकिटाची किंमत ११५ रुपयांवरून १२५ रुपये करण्यात आली होती. आता पुन्हा १० रुपयांची वाढ झाल्याने एका पाकिटासाठी १३५ रुपये मोजावे लागणार आहेत.

Gold Flake Premium Cigarette Price
Gold Silver Price Today: सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ! सण संपताच दर कोसळले, आता आणखी स्वस्त होणार का?

वाढत्या कराचा ITC च्या सिगारेट व्यवसायावर परिणाम

वाढत्या कराचा ITC च्या सिगारेट व्यवसायावर परिणाम होत आहे, त्यामुळे कंपनीने सिगारेटच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना कायदेशीर मार्गाने विकल्या जाणाऱ्या सिगारेटच्या विक्रीवर परिणाम होत असल्याचे सांगितले होते.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सिगारेटवरील कर वाढल्यामुळे अधिकृतपणे विकल्या जाणाऱ्या सिगारेट आणि अवैध मार्गाने विकल्या जाणाऱ्या सिगारेट यांच्या किमतीतील फरक वाढत आहे. त्यामुळे काही ग्राहक स्वस्त मिळणाऱ्या अवैध सिगारेटकडे वळण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर तिमाहीत सिगारेट व्यवसायाचा नफा २७ टक्क्यांनी घसरला

वाढत्या कराचा आणि बाजारातील परिस्थितीचा परिणाम ITC च्या आर्थिक निकालांवरही दिसून आला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या सिगारेट व्यवसायाचा नफा २७.२ टक्क्यांनी घसरून ३,८१३ कोटी रुपयांवर आला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला या व्यवसायातून ५,२४१ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

याशिवाय, सिगारेट व्यवसायातून मिळणाऱ्या निव्वळ महसुलातही २१ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे कंपनीसमोर सिगारेट व्यवसायातील नफा टिकवून ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

Gold Flake Premium Cigarette Price
Ramayana BO Collection Day 7: धुरंधर, पुष्पा, बाहुबली अन् जवानला मागे टाकत ‘रामायण’ने रचला इतिहास; सात दिवसांत किती कोटी कमावले?

ITC च्या एकूण कमाईत Gold Flake Premiumचा मोठा वाटा

Gold Flake Premium हा ITC च्या महत्त्वाच्या सिगारेट ब्रँडपैकी एक आहे. या ब्रँडच्या रेग्युलर साइज सिगारेटला बाजारात मोठी मागणी आहे. माहितीनुसार, ITC च्या एकूण सिगारेट महसुलात या सिगारेटचा वाटा सुमारे ४६ ते ५० टक्के असल्याचा अंदाज आहे.

सिगारेट व्यवसाय हा ITC च्या नफ्याचा प्रमुख स्रोत आहे. या व्यवसायातील नफ्याचे प्रमाण सुमारे ७० टक्के असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे Gold Flake Premium च्या किमतीत करण्यात आलेली वाढ कंपनीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.