Rahul Shelke
सिगारेटचा शोध एका व्यक्तीने लावला, असं ठामपणे सांगता येत नाही. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांचे योगदान यात आहे.
आजपासून सुमारे हजार वर्षांपूर्वी मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील माया व अझ्टेक लोक
तंबाखू पानात गुंडाळून किंवा नळीमध्ये भरून ओढायचे.
16व्या शतकात स्पॅनिश प्रवाशांनी तंबाखू युरोपमध्ये आणली. सुरुवातीला गरीब लोक उरलेली तंबाखू कागदात गुंडाळून ओढायचे.
स्पेनमध्ये अशा कागदात गुंडाळलेल्या तंबाखूला ‘पेपलेट’ असं म्हणत. यातूनच पुढे सिगारेटची कल्पना आकाराला आली.
1865 साली वॉशिंग्टन ड्यूक यांनी अमेरिकेत हाताने वळवलेल्या सिगारेट्स विकायला सुरुवात केली. हीच आधुनिक सिगारेटची सुरुवात होती.
1889–81 मध्ये जेम्स अल्बर्ट बोनसॅक यांनी पहिली सिगारेट बनवणारी मशीन शोधली.
या मशीनमुळे हाताने सिगारेट वळवण्याची गरज राहिली नाही. एका दिवसात हजारो सिगारेट तयार होऊ लागल्या. सिगारेट स्वस्त आणि सहज उपलब्ध झाली.
जेम्स बुकानन ड्यूक यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि जाहिरात सुरू केली.
म्हणून त्यांना ‘आधुनिक सिगारेटचा जनक’ मानलं जातं.
2003 मध्ये चीनमधील फार्मासिस्ट होन लिक यांनी ई-सिगारेटचा शोध लावला. धूर नसलेली सिगारेट म्हणून ती ओळखली जाऊ लागली.