नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट ( Israeli Prime Minister ) 2 एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. बेनेट यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा आहे. मोदी आणि बेनेट यांच्या दरम्यान द्वितीय संबंध मजबूत करण्याबरोबरच रशिया-युक्रेन युध्दावर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
ग्लासगो येथे गेल्या नोव्हेंबर महिन्यात जलवायू परिवर्तनासंदर्भात सीओपी -26 परिषद झाली होती. त्यावेळी मोदी आणि बेनेट एकमेकांना भेटले होते. भारताने 30 वर्षांपूर्वी इस्रायलसोबत राजकीय संबंध प्रस्थापित केले होते. या पार्श्वभूमीवर आपला भारत दौरा महत्वपूर्ण राहणार असल्याचे बेनेट यांनी सांगितले आहे.
हेही वाचलं का?