Iran - America War | सिंलिंडरचा तुटवडा आता, ‘इंडक्शन कुकटॉप' ही आऊट ऑफ स्टॉक?

एलपीजी टंचाईच्या भीतीमुळे इंडक्शन कुकटॉपची मागणी वाढली
Iran - America War
Iran - America War | सिंलिंडरचा तुटवडा आता, ‘इंडक्शन कुकटॉप' ही आऊट ऑफ स्टॉक?
Published on
Updated on

Iran - America War इराण अमेरिका युद्धाची झळ आता सर्वसामान्य भारतीय लोंकाना बसू लागली आहे. सर्वात पहिले म्हणजे एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सिलेंडर मिळेना झाले आहेत. अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. तर काही ठिकाणी वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्‍यातच कर्मशिअल गॅस पुरवठा प्रशासनाने बंद केला आहे. हॉटेल व्यवसाय ठप्प् हाण्याच्या मार्गावर आहे. अशातच आणखी एक बातमी म्हणजे, गॅसला पर्याय ठरु शकत असलेल्या इलेक्ट्रीक शेगडी किंवा इंडक्शन कुकटॉप यांची मागणी वाढल्याने ते ही आऊट ऑफ स्टॉक होत आहेत.

मागणीमुळे Amazon, Flipkart आणि Blinkit यांसारख्या प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनेक कंपन्यांचे इंडक्शन कुकटॉप सध्या 'आऊट ऑफ स्टॉक' (Out of Stock) दिसत आहेत. एका वृत्तवाहिनेने केलेल्या सर्वेमध्ये असे दिसून आले की प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर इंडक्शन कुकटॉपची उपलब्धता झपाट्याने कमी झाली आहे:

Iran - America War
LPG Shortage Impact On Houses: गॅस टंचाईने घरांचे बजेट कोलमडले; स्वयंपाक कसा करायचा?

Blinkit: या प्लॅटफॉर्मवर जवळपास सर्वच मॉडल्सचा साठा संपलेला दिसत आहे.

Amazon: येथे केवळ मोजक्याच ब्रँड्सचे कुकटॉप उपलब्ध असून इतर बहुतांश ब्रँड्स उपलब्ध दाखवत नाहीत

Flipkart: फ्लिपकार्टवर काही ब्रँड्स उपलब्ध असले तरी, अनेक लोकप्रिय मॉडेल्सचा साठा संपला आहे.

मागणीत वाढ

टाटा समूहाच्या 'क्रोमा' (Croma) या इलेक्ट्रॉनिक्स रिटेलरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत इंडक्शन कुकटॉपच्या मागणीत तीन पटीने वाढ झाली आहे. पिजन' आणि 'गिलमा' यांसारखे ब्रँड असलेल्या 'स्टोव्हक्राफ्ट लिमिटेड'ने त्यांच्या ऑनलाइन विक्रीत चार पटीने वाढ झाल्याचे नमूद केले आहे.

Iran - America War
LPG Crisis Debate|संसदेत LPG संकटावर चर्चा, राहुल गांधींनी व्‍यक्‍त केली 'भीती'; पेट्रोलियन मंत्री पुरींनी दिले प्रत्युत्तर

वाढत्या मागणीचे मुख्य कारण

गेल्या काही दिवसांपासून गॅस एजन्सीबाहेर सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र अनेक शहरांत पाहायला मिळत आहे. सरकारने व्यावसायिक एलपीजी बुकिंगवर काही मर्यादा आणून घरगुती पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक कुटुंबे इंडक्शन कुकटॉपसारख्या पर्यायांकडे वळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news