US Israel Iran Attack: 'आम्ही आमच्या नेत्याचा मृत्यू विसरणार नाही', खामेनेईंच्या हत्येनंतर जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शने

Jammu Kashmir protests: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांत तीव्र निदर्शने करण्यात आली.
US Israel Iran Attack
US Israel Iran Attackfile photo
Published on
Updated on

US Israel Iran Attack Jammu Kashmir protests

श्रीनगर: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांत तीव्र निदर्शने करण्यात आली. श्रीनगर, सोनवारी आणि बांदीपोरा यांसारख्या भागांत मोठ्या संख्येने शिया समुदायातील महिला व पुरुष रस्त्यावर उतरले होते. 'आम्ही आमच्या नेत्याचे बलिदान कधीही विसरणार नाही', अशा घोषणा देत आंदोलकांनी खामेनेई यांचे फोटो हातात धरून आपला निषेध नोंदवला.

US Israel Iran Attack
Khamenei killed: अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई ठार; तिसऱ्या महायुद्धाचे सावट

'ही हत्या नव्हे, तर विश्वासघात'

बारामूला येथील एका महिला आंदोलकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "शिया समुदाय बलिदान पत्करायला घाबरत नाही. आम्ही खामेनेई यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत." तर रामबनमधील शिया नेते सैयद समर काजमी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले, "आम्ही आमचा प्रिय नेता गमावला आहे, पण त्यांचे कार्य आम्ही विसरणार नाही. अमेरिका आणि इस्रायलने कशा प्रकारे फसवणूक करून ही हत्या केली, हे आम्ही येणाऱ्या पिढ्यांना सांगू. जगाने मौन पाळले असताना खामेनेई यांनी पॅलेस्टाईनमधील अत्याचाराविरोधात आवाज उठवला, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आले."

महबूबा मुफ्ती आणि मीरवाइज यांच्याकडून निषेध

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "इराणवर पुन्हा एकदा इस्रायलने केलेले आक्रमण निषेधार्ह आहे. इराण हा मुस्लिमांचा एक कणखर आवाज आहे. कोणतीही क्षेपणास्त्रे किंवा धमक्या इराणचे सार्वभौमत्व आणि मनोबल नष्ट करू शकत नाहीत."

हुर्रियत नेते मीरवाइज उमर फारूक यांनीही या हल्ल्याची निंदा केली. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून इस्रायलला लगाम घातला जात नसल्यामुळेच अशा प्रकारची मनमानी वाढत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

इराणमध्ये ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा; अनेक वरिष्ठ अधिकारीही ठार

खामेनेई यांच्या निधनानंतर इराण सरकारने देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आणि सात दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. या भीषण हल्ल्यात केवळ खामेनेईच नव्हे, तर त्यांची मुलगी, जावई, नातू आणि इराणचे सात उच्चपदस्थ लष्करी अधिकारीही ठार झाले आहेत.

US Israel Iran Attack
Israel Attack Iran: संपूर्ण मध्य पूर्व धोकादायक वळणावर! सोने-चांदीच्या गुंतवणूकदारांनी काय करावे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news