Iran Israel War Impact on India: युद्धाच्या झळा; फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन महागणार

इराण-इस्रायल संघर्षाचा थेट परिणाम; कच्चा माल, वाहतूक खर्च वाढल्याने इलेक्ट्रॉनिक्स दर १०% पर्यंत वाढणार
Iran Israel War Impact on India
Iran Israel War Impact on IndiaPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे केवळ इंधनाचेच नव्हे तर प्लास्टिक आणि पॉलिमरच्या दरात वाढ झाली आहे. वाढलेला वाहतूक खर्च, रुपयाचे झालेले अवमूल्यन यामुळे दरवाढीला आणखी चालना मिळाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात फ्रिज, वातानुकूलित यंत्रणा (एसी) आणि वॉशिंग मशिन सारख्या दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर तीन ते दहा टक्क्यांनी वाढतील. गतवर्षी वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीमुळे घटलेले दर युद्धामुळे भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Iran Israel War Impact on India
Iran Israel War Impact: युरोपियन युनियनकडून गॅस साठा कमी करण्याचे आवाहन

युद्धामुळे होर्मूझ सामुद्रधुनीतील जलवाहतूक ठप्प पडली आहे. जहाज वाहतूकीचा खर्च वाढला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने पॉलिप्रोपिलीन, स्टायरीन मोनोमर आणि एबीएस यांसारख्या पेट्रोकेमिकल वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. सर्व महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यासाठी या वस्तू महत्त्वाच्या आहेत. त्यातच एका डॉलरचे मूल्य ९३.७१ रुपयांवर घसरले आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि मालवाहतुकीच्या खर्चात झालेली वाढ यामुळे संपूर्ण मूल्य साखळीतील खर्च वाढला आहे. त्यामुळे बहुतांश प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे उत्पादक दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत.

Iran Israel War Impact on India
HC on railway compensation | गर्भातील बाळचा अपघाती मृत्यू झाल्यास रेल्वेला द्यावी लागेल स्वतंत्र भरपाई : हायकोर्ट

दरवाढीचे प्रमाण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या श्रेणीनुसार बदलते. म्हणजे कोणता कच्चामाल किती प्रमाणात आहे, त्या प्रमाणात दरवाढ अवलंबून असेल. उदाहरणार्थ, वॉशिंग मशीनमध्ये प्लास्टिकचा वापर अधिक केला जातो. प्लॅस्टिकवापर एकूण खर्चाच्या १५ ते २० टक्के असतो. ज्यामुळे कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम या उपकरणांवर अधिक होईल.

हायर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष एन. एस. सतीश म्हणाले की, पॉलिमरच्या वाढलेल्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. उत्पादन खर्चातील वाढीचा काही भागच कंपन्या सहन करू शकतात. त्यामुळे, कंपन्यांकडे एप्रिलमध्ये किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. एअर-कंडिशनर्स आणि वॉशिंग मशीनसाठी ८ ते १० टक्के आणि फ्रिजमध्ये ४ ते ५ टक्के दरवाढ होऊ शकेल.

Iran Israel War Impact on India
थेट खात्‍यावर येणार १२ हजार रूपये! जेवणावळी घालून उघडली शेकडो खाती , बँकेत गेल्यावर समजलं...

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस बिझनेसचे बिझनेस हेड आणि ईव्हीपी, कमल नंदी म्हणाले की, युद्धामुळे पॉलिमर आणि प्लॅस्टिकसह इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. मालवाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. वाढलेला सर्व खर्च कंपन्या उचलू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागेल. एअर-कंडिशनरची किंमत ३ ते ५ टक्के, वॉशिंग मशीनची ७ ते १० टक्के आणि फ्रिजची किंमत ५ ते ७ टक्क्यांनी वाढेल.

व्हिडिओटेक्सचे संचालक अर्जुन बजाज म्हणाले की, हा दबाव तात्काळ आणि संरचनात्मक दोन्ही आहे. युद्धाचा परिणाम पॉलिमर, विस्तारित पॉलिस्टीरिन (ईपीएस) आणि इतर पॅकेजिंग साहित्याच्या पुरवठ्यावर होऊ लागला आहे. कॅबिनेटचे भाग, केबल्स आणि इन्सुलेशन साहित्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉलिमर-आधारित साहित्याच्या किमतीत जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर तांब्याच्या किमतीत उच्चांकी वाढ झाली आहे. चलनातील अस्थिरता आणि सागरी मालवाहतुकीच्या शुल्कात ३०० ते ४०० टक्क्यांची वाढ यामुळे खर्च आणखी वाढला आहे.

Iran Israel War Impact on India
supreme court | 'पत्नी म्हणजे मोलकरीण नव्हे, पतीनेही घरकामात, स्वयंपाकात मदत करायला हवी' : सर्वोच्च न्यायालय

कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ..

ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार १ ते ११ मार्च या कालावधीत कच्च्या मालाच्या किमतीत तब्बल ५९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढला आहे. म्हणून किमतीत वाढ करण्याची तयारी प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news