काँग्रेस सरकारच्या काळात महागाई अधिक होती : निर्मला सितारामन

 काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकाळात तुलना केल्यास काँग्रेसच्या कार्यकाळात महागाई जास्त  होती, -निर्मला सितारमण
काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकाळात तुलना केल्यास काँग्रेसच्या कार्यकाळात महागाई जास्त  होती, -निर्मला सितारमण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तेसवा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत अर्थसंकल्पाविषयीच्या प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. यावेळी निर्मला सितारामन यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सत्तेत असताना महागाई जास्त होती. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकाळात तुलना केल्यास काँग्रेसच्या कार्यकाळात महागाई जास्त होती. काँग्रेस सत्तेत असताना महागाईचा दर ९.१ टक्के होता. कोरोना महामारीचा सामना करावा लागत असतानाही भाजपच्या कार्यकाळात महागाईचा दर ६.२ टक्के आहे, असा दावा निर्मला सितारामन यांनी केला.

भारतात क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय हा सर्वांचा विचार लक्षात घेऊन घेण्यात आला आहे, असे सितारामन म्हणाल्या. या आभासी संपत्तीवर कर आकारण्याचा अर्थ असा नाही की सरकार या संपत्तीला वैध ठरवत आहे. ७-८ वर्षांपूर्वी जीडीपीचे उत्पन्न १.१ लाख कोटी रूपये होते. आता ते २.३२ लाख कोटी रूपये झाले आहे. २०१३-१४ मध्ये निर्यात उलाढाल २.८५ लाख कोटी रूपये होती, आज ४.७ लाख कोटी रूपये झाली आहे. २०१३ -१४ मध्ये विदेशी चलन २७५ अरब अमेरिकन डॉलर एवढे होते, सध्या ६३० अरब अमेरिकन डॉलर इतके आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.

मनरेगाच्या चर्चेविषयी उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या की काँग्रेसने मनरेगा योजना सुरू केली. मनरेगाच्या दुरूपयोगाचे श्रेय काँग्रेसचे आहे. आम्ही मनरेगा पारदर्शक आणि योग्य पद्धतीने लागू केली. काँग्रेसवर जोरदार टीका करत सीतारामन राज्यसभेत म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले गरीबीचा अर्थ जेवण आणि भौतिक वस्तूंची कमी असणे. जर कोणाकडे आत्मविश्वास असेल तर कोणीही यापासून तो व्यक्ती दूर राहणार नाही.

हेही वाचलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news