Girl Attacks Grandfather Cricket Bat: २० वर्षाच्या मुलीने ७५ वर्षांच्या आजोबांच्या डोक्यात घातली क्रिकेटची बॅट... कारण काय?

२० वर्षाची मुलगी तिच्या आजी आजोबांच्या घरात रात्री २.३० वाजता मोटरसायकलवरून आली होती.
Girl Attacks Grandfather Cricket Bat
Girl Attacks Grandfather Cricket Batpudhari
Published on: 
Updated on: 

Girl Attacks Grandfather Cricket Bat: २० वर्षाची कॉलेजला जाणाऱ्या मुलीने तिच्या ७५ वर्षाच्या आजोबांना क्रिकेट बॅटने मारहाण करत त्यांचा जीव घेतला. ही घटना इंदौरमध्ये एरोड्रोम भागात रविवारी सकाळी घडली. पोलीस तपासादरम्याम त्या मुलीने आजोबा तिच्यासोबत अनेकवेळा चुकीचं वागले त्याच्या रागातून हे कृत्य केल्याचं सांगितलं.

Girl Attacks Grandfather Cricket Bat
Crime News : छावणीत राडा : गोवंश भरलेला ट्रक पकडणाऱ्या पोलिसांवर टोळक्याचा जीवघेणा हल्ला

डीसीपी नरेंद्र रावत यांनी सांगितलं की २० वर्षाची मुलगी तिच्या आजी आजोबांच्या घरात रात्री २.३० वाजता मोटरसायकलवरून आली होती. तिचा तिच्या पालकांशी वाद झाल्यानंतर ती तिथे आली होती. आजीने दरवाजा उघडल्यावर ही तरूणी तावातावाने आता आली आणि तिने क्रिकेटच्या बॅटने आपल्या आजोबांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तिने आजोबांच्या डोक्यात बॅट घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Girl Attacks Grandfather Cricket Bat
Crime News : ओला चालकाकडून वृद्ध प्रवाशाला गंडा; फोन-पेवरून ९० हजार लंपास

आजीने आपल्या नातीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने हल्ला करणे सुरूच ठेवले. आजीने त्वरित आपल्या कुटुंबीयांना कळवलं त्यानंतर कुटुंबीयांनी आजोबांना अरबिंदो रूग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी आजोबांना मृत घोषित केलं.

मृत व्यक्ती ही राज्य सशस्त्र दलातून निवृत्त झाली होती. ते त्यांची पत्नीसोबत रहात होते. त्यांची नात ही तिच्या आई-वडिलांसोबत महालक्ष्मी नगरमध्ये राहते.

Girl Attacks Grandfather Cricket Bat
Crime News : १२ कोटींच्या कमिशनसाठी कंत्राटदाराला धमकावून लुटले

नातीने पोलीस तपासात सांगितलं की तिच्या आजोबांनी तिच्यासोबत अनेकवेळी चुकीचं वर्तन केलं आहे. दरम्यान पोलिसांनी २० वर्षाच्या मुलीला ताब्यात घेतलं. तिची कसून चौकशी होत आहे. तसेच तिने आजोबांवर केलेल्या आरोपांबाबत देखील तापस केला जात आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. तपास अधिकारी मुलीची चौकशी करून नेमका घटनाक्रम कसा घडला आणि आजोबांना मारण्यापर्यंत अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली याची देखील चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news