Crime News : ओला चालकाकडून वृद्ध प्रवाशाला गंडा; फोन-पेवरून ९० हजार लंपास

पासवर्ड चोरून मारला डल्ला; संतपुरे हॉस्पिटलसमोरील घटना, दोघांवर गुन्हा दाखल
Crime News
Crime News : ओला चालकाकडून वृद्ध प्रवाशाला गंडा; फोन-पेवरून ९० हजार लंपासfile photo
Published on: 
Updated on: 

Elderly passenger robbed by wet driver; 90 thousand scams from PhonePay

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आजारी पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी बुक केलेल्या ओला कॅबच्या चालकाने ६६ वर्षीय वृद्धाला भाड्यावरून हुज्जत घालत त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. एवढेच नव्हे तर, वृद्धाने भाडे देताना चोरून पाहिलेल्या फोन-पे पासवर्डचा वापर करून या चालकाने त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ९० हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवून गंडा घातला. हा प्रकार गुरुवारी (दि. १) दुपारी ३:३८ ते शुक्रवारी (दि.२) सकाळी १० वाजेदरम्यान विष्णूनगर येथे घडला. याप्रकरणी रविवारी (दि.४) जवाहर नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Airport runway expansion : विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण; शेतकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध

ओला कॅब चालक दीपक सायमन शेळके आणि कुणाल दीपक शेळके अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी द्वारकादास हरिनारायण बाहेती (६६, रा. कासलीवाल मार्बल, बीड बायपास, सातारा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, ते त्यांची पत्नी भारती यांना गुडघेदुखीचा त्रास असल्याने त्यांना संतपुरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न्यायचे होते.

१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बाहेती यांनी ओला अॅपवरून कॅब बुक केली होती. टोयोटा कार (एमएच-४८-बीएच-०६३४) घेऊन चालक तिथे आला आणि त्यांना घेऊन संतपुरे हॉस्पिटलला पोहोचला. ओला अॅपवर या प्रवासाचे भाडे २१० रुपये दाखवत होते, मात्र चालकाने हुज्जत घालत बाहेती यांना ४२० रुपये फोन पे द्वारे देण्यास भाग पाडले. बाहेती पेमेंट करत असताना चालकाने त्यांचा फोन पे चा पासवर्ड लपून पाहिला होता.

Crime News
Water Sources : महापालिकेकडून पर्यायी जलस्रोतांची चाचपणी सुरू

पेमेंट चेक करण्याच्या बहाण्याने पळवला मोबाईल

बाहेती पेमेंट करून पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये गेले असता, चालक दीपक शेळके पुन्हा तिथे आला आणि तुमचे पेमेंट झालेले नाही, मोबाईल दाखवा मी चेक करतो असे म्हणाला. बाहेती यांनी त्यांचा मोबाईल त्याच्या हातात दिला. त्याचवेळी हॉस्पिटलच्या वॉचमनने गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने, गाडी बाजूला लावतो असा बहाणा करून चालक मोबाईल घेऊन पसार झाला. बाहेती यांनी एका नातेवाईकाच्या दुचाकीवरून त्याचा विष्णूनगर परिसरापर्यंत पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

मोबाईल सोसायटीच्या वॉचमनकडे दिला

दुसऱ्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने बाहेती यांचा मोबाईल कासलीवाल मार्बल सोसायटीच्या गेटवर वॉचमन साळवे यांच्याकडे आणून दिला. बाहेती यांनी मोबाईल परत मिळाल्यानंतर फोन पे चेक केले असता, कुणाल दीपक शेळके याच्या नावावर १ ऑक्टोबर रोजी दुपारी ०४:२३ ते ०४:२४ या अवघ्या एका मिनिटाच्या कालावधीत तीन ट्रान्झेंक्शन झाल्याचे दिसले.

आरोपीने ३० हजार, ४० हजार आणि २० हजार असे एकूण ९० हजार रुपये कुणाल शेळके याच्या खात्यावर वळवले होते. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाहेती यांनी तत्काळ २ ऑक्टोबरला १९३० या हेल्पलाईन पोर्टलवर तक्रार करून बँक खाती फ्रीज केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news