IndiGo प्रवाशांना मोठा झटका! लहान मुलांच्या तिकिटांपासून एक्स्ट्रा बॅगेजचे दर वाढले

अतिरिक्त सामान आणि प्राधान्य चेक-इनसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार
Indigo
IndigoPudhari
Published on
Updated on

IndiGo fee hike : इंडिगो एअरलाईन्सने (IndiGo Airlines) अनेक सेवांचे दर वाढवले ​​आहेत; यामध्ये लहान मुलांचा प्रवास, एकट्याने प्रवास करणारी अल्पवयीन मुले (unaccompanied minors), प्राधान्य चेक-इन आणि बोर्डिंग, अतिरिक्त सामान आणि प्रवास प्रमाणपत्रे यांचा समावेश आहे.

लहान मुलांसोबतचा प्रवास महागला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरांमधील हा बदल म्हणजे पूरक सेवांच्या शुल्काचा आढावा घेण्याच्या आणि त्या अद्ययावत करण्याच्या इंडिगोच्या नियमित प्रक्रियेचाच एक भाग आहे.नवीन दरवाढीचा लहान मुलांसह (दोन वर्षांखालील) प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. लहान मुलांच्या प्रवासाचे शुल्क २,००० रुपयांवरून ३,००० रुपये करण्यात आले आहे. यात १,००० रुपयांची वाढ झाली आहे. हे शुल्क दोन वर्षांखालील मुलांसाठी लागू आहे. या व्यवस्थेअंतर्गत, लहान मुलांना स्वतंत्र सीट मिळत नाही, तरीही त्यांच्यासाठी तिकीट बुक करणे अनिवार्य असते. या नवीन बदलामुळे एअरलाईनला सुमारे ९० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल, असा अंदाज आहे.

Indigo
Crude Oil Prices Drop: दिलासादायक! पाईपलाईन हल्ल्यानंतर सौदीने शोधला 'पर्यायी मार्ग'; जागतिक तेलाच्या किमतीत घट

अतिरिक्त सामानासाठी अधिक खर्च

इंडिगोच्या विमानांमध्ये विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांना आता अतिरिक्त सामानासाठी जास्त शुल्क द्यावे लागेल. अतिरिक्त सामानाचे शुल्क आता प्रति किलो ८०० रुपये झाले आहे. ते पूर्वी ७०० रुपये होते.

Indigo
US Iran war cost : इराणला नष्ट करायला गेले अन् स्वतःच अडकले; युद्धात अमेरिकेने केला तब्बल ३.२० लाख कोटींचा चुराडा!

प्राधान्य चेक-इन आणि बोर्डिंग शुल्कात वाढ

इंडिगोने प्राधान्य चेक-इन (priority check-in) आणि बोर्डिंगसाठीचे शुल्कही ४५० रुपयांवरून ६५० रुपये केले आहे; म्हणजेच प्रवाशांना या सेवेसाठी २०० रुपये अधिक द्यावे लागतील. याव्यतिरिक्त, प्रवास प्रमाणपत्राचे शुल्क २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आले आहे.

Indigo
CBSE Three Language Policy : "निर्णयासाठी कोणतीही घाई नको "; 'त्रि-भाषा धोरणा'बाबत सर्वोच्च न्यायालयाचा CBSE ला सल्ला

देशांतर्गत क्षेत्रात इंडिगोचा ६६% पेक्षा जास्त बाजारहिस्सा

भारताच्या देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगोचा बाजार हिस्सा ६६% पेक्षा अधिक आहे. आता कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला विस्तार वेगाने वाढवण्याचे धोरण राबवत आहे. २०२८ च्या सुरुवातीपासून एअरलाईनच्या ताफ्यात 'वाइड-बॉडी' A350-900 विमाने सामील होण्याची अपेक्षा आहे. इंडिगोने आधीच ९०० हून अधिक विमानांची ऑर्डर दिली आहे. या एअरलाईनकडे ४३० हून अधिक विमानांचा ताफा आहे आणि ती दररोज सुमारे २,२०० विमानांचे उड्डाण करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news