

नेमकं काय होतंय?
भूकंपाच्या धोक्यावर काय परिणाम होणार?
असा असतो टेक्टॉनिकल प्लेस्टचा खेळ
दैनंदिन जीवनावर काय परिणाम?
Indian Subcontinent Earthquake Intensity: संपूर्ण भारत ज्या भारतीय टेक्टॉनिकल प्लेटवर आहे. ती प्लेट दोन भागात विभागत आहे. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार नुकत्याच झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की इंडियन टेक्टॉनिकल प्लेटचा खालचा भाग वेगळा होऊन तो पृथ्वीच्या आतील भागात (मेंटल) खचत चालला आहे. या प्रक्रियेला भौगोलिक भाषेत डेलामिनेशन म्हणतात. ही नवीन माहिती समोर आल्यानंतर आता हिमालयाच्या भागातील भूकंपाचा पॅटर्न बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुन्या सर्व धारणांना आता आव्हान मिळणार आहे.
इंडियन टेक्टॉनिकल प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यात घर्षण आणि टक्कर ही जवळपास ६ कोटी वर्षापासून सुरू झाली आहे. या घर्षण अन् टक्करेमुळेच हिमाल रेंज तयार झाली आहे. यापूर्वी वैज्ञानकांची धारणा होती की भारतीय प्लेट ही पूर्णपणे युरेशियन प्लेटच्या खालच्या भागात सरकत आहे. मात्र आता नव्या अभ्यासानुसार इंडियन टेक्टॉनिकल प्लेटचा भाग पूर्णपणे एकसमान नाहीये. तिबेटच्या खालचा भाग जास्त दाट आणि जड आहे. तो भाग वरच्या भागापासून वेगळा होत आहे. तो भाग मेंटलमध्ये बुडत आहे. तर वरचा हलका भाग हा पुढं सरकत आहे.
वैज्ञानिकांनी या नव्या संशोधनाची माहिती भूकंपीय तरंगांचे विश्लेषण केल्यानंतर समोर आली आहे. त्याचबरोबर संशोधकांनी तिबेटमधील गरम पाण्याच्या स्त्रोतांमधील हिलियम आयसोटोपची देखील तपासणी केली होती. हिलियम - ३ गॅस हा मेंटलमधून म्हणजे पृथ्वीच्या आतील भागातून येते. हा गॅस वर येत असेल तर प्लेटमध्ये भेग पडत आहे असा निष्कर्ष निघतो. मेंटलचा गरम भाग वर येत आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील भू वैज्ञानिक सायमन क्लेम्परर आणि त्यांच्या टीमे हा अभ्यास केला आहे. याचे प्रेझेंटेशन जिओफिजिकल युनियनच्या मिटिंगमध्ये सादर करण्यात आले.
हिमालय हे आधीच भूकंप प्रवण क्षेत्र आहे. आता हे डेलिमिनेशन या भागात नवे टेन्शन पॉईंट्स तयार करू शकतात. त्यामुळे या भागात भूकंपांची संख्या आणि तीव्रता दोन्ही वाढू शकतात. सायमन क्लेम्परर यांनी प्लेटचे दुंभगने आणि खचणे यामुळे पृथ्वीच्या वरच्या स्तरावर नवा दबाव निर्माण करू शकतात असा इशारा दिला. यामुळे मोठे भूकंप देखील होण्याची शक्यता आहे. तिबेट प्लेटोवरील कोना सांग्री रिफ्ट सारख्या जागांवर जास्त धोका निर्माण होऊ शकतो.
टेक्टॉनिकल प्लेट्स या पृथ्वीच्या बाह्य भागात असलेले क्रस्टचे (पदर) तुकडे आहेत. हे भूभागाचे तुकडे मॅग्मावर तरगंत असतात. इंडियन टेक्टॉनिकल प्लेट ही प्रत्येक वर्षी उत्तर दिशेला ५ सेंटिमिटरने सरकते. तिबेटच्या खालच्या भागात ही प्लेट खचत आहे. मात्र आता ही खचत नसून ती तुटत आहे.
वैज्ञानिकांनी जीपीएस डेटा, भूकंप लहरी आणि सॅटेलाईट इमेजच्या आधारे तिबेट उंच होत आहे असा निष्कर्ष काढला आहे. असं का होतंय तर प्लेटता दबाव जास्त झाल्यामुळं वरचा भूभाग हा हिमालयाला उंच करत आहे. प्रत्येक वर्षी ५ सेंटीमीटरनं हिमालयाची उंची वाढते. मात्र खालचा भाग घसरत नाहीये.
आता काय होणार? तर रिफ्टमुळे नवीन प्लेट्स तयार होतील अन् त्या हिमालयाला अजून उंच अन् चपटा करण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया अत्यं संथपणे होते. मात्र याचा परिणाम खूप दीर्घ काळ सुरू राहणार आहे.
हिमायल बेल्टमध्ये जगभरातील ८० टक्के भूकंप येतात. भारत, नेपाळ, चीनमध्ये लाखो घरांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात ९ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.
त्याचबरोबर मॅग्मा वर आल्यानं नवे ज्वालामुखी निर्माण होऊ शकतात. बर्फ वितळू शकतो त्यामुळं गंगा - ब्रम्हपुत्रा नदीची पाणी पातळी वाढून पूर येऊ शकतो.
हिमालयन क्षेत्रात १० कोटी पेक्षा जास्त लोकं राहतात. दिल्ली एनसीआरपर्यंत या भूकंपाचे झटके बसतात. जर याची तीव्रता वाढली तर जवळपास १ लाख कोटी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हिमालयातील जैव विधितता देखील धोक्यात येऊ शकते. हवामान बदल अजून वेगवान होऊ शकतो.