

Indian Army Agniveer 2025
नवी दिल्ली : भारतीय सैन्य अग्निवीर २०२५ भरतीअंतर्गत ३० जून ते १० जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेची (CEE) उत्तरपत्रिका लवकरच जाहीर केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी भारतीय सैन्य अग्निवीर २०२५ ची ऑनलाइन परीक्षा दिली आहे, ते अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन तात्पुरती उत्तरतालिका (provisional key) तपासू शकतील.
भारतीय सैन्य अग्निवीर परीक्षा इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलुगू, पंजाबी, ओडिया, बंगाली, उर्दू, गुजराती, मराठी आणि आसामी अशा एकूण १३ भाषांमध्ये घेण्यात आली होती. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा बैठक क्रमांक आणि जन्मतारीख लागणार आहे.
उमेदवारांनी भारतीय सैन्य अग्निवीर २०२५ ची तात्पुरती उत्तरपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात :
स्टेप १ : सर्वप्रथम भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा.
स्टेप २ : होम पेजवर उपलब्ध असलेल्या 'Indian Army Agniveer Answer Key 2025' या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३ : यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे उमेदवारांना त्यांचे लॉग-इन माहिती (उदा. बैठक क्रमांक, जन्मतारीख) टाकावी लागेल.
स्टेप ४ : उत्तरपत्रिका तपासा आणि डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट-आउट काढून ठेवा.
अधिक माहितीसाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
या ऑनलाइन परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारण्यात आले होते. अर्ज केलेल्या पदाच्या श्रेणीनुसार, उमेदवारांना एका तासात ५० प्रश्न किंवा दोन तासांत १०० प्रश्न सोडवायचे होते. सुमारे २५ हजार रिक्त पदांसाठी अग्निवीर २०२५ भरती प्रक्रिया यावर्षी १२ मार्च रोजी सुरू झाली होती. CEE परीक्षेसाठी प्रवेशपत्र १६ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. ही भरती जनरल ड्युटी, टेक्निकल, ट्रेड्समन, नर्सिंग असिस्टंट, शिपाई फार्मा अशा विविध पदांसाठी राबवली आहे.