YouTube Video Removed: युट्यूबवरून व्हिडिओ हटवण्यात भारताचा पहिला नंबर... गुगलकडील तक्रारीत तब्बल ६१ टक्क्यांची वाढ

YouTube Video Removed : भारतात सध्या कम्युनिटी गाईडलाईनच्या नावाखाली युट्यूबवरून व्हिडिओ गायब करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे.
YouTube Video Removed
YouTube Video Removedpudhari
Published on: 
Updated on: 

YouTube Video Removed: भारत जागतिक स्तरावर अनेक गोष्टीत आघाडीवर असल्याची जाहिरात आपण अभिमानाने करतो. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे गर्वाने मिरवतो. मात्र त्याच भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काय स्थिती आहे हे सांगणारी आकडेवारी समोर आली आहे.

भारतात सध्या कम्युनिटी गाईडलाईनच्या नावाखाली युट्यूबवरून व्हिडिओ गायब करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. युट्यूबने एप्रिल ते जून २०२६ दरम्यान, भारतातील तब्बल ३४.४ लाख व्हिडिओ हटवले होते. ही आकडेवारी कोणत्याही देशाच्या तुलनेत खूप जास्त आहे.

YouTube Video Removed
YouTube Monopoly | ‘यूट्यूब’च्या मक्तेदारीचे आव्हान

व्हिडिओ उडवण्यात भारताचा पहिला नंबर

वढंच नाही तर युट्यूबवरून व्हिडिओ हटवण्याचे प्रमाण गेल्या तीमाहीत २८ टक्क्यांनी वाढलं आहे. युट्यूबने कम्युनिटी गाईडलाईनचे कारण देत जगभरातील १.१ कोटी व्हिडिओ गेल्या क्वार्टरमध्ये उडवले होते. त्यातील तब्बल ३१ टक्के व्हिडिओ हे भारतातील होते. या यादीत जगातील सर्वात जुनी लोकशाही अशी शेखी मिरवणारी अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर असून त्या देशाचे १२.४ लाख व्हिडिओ हटवण्यात आळे आहेत. इंडोनेशियाचे देखील ९.२ व्हिडिओ युट्यूबने काढून टाकले आहेत.

YouTube Video Removed
YouTuber Madhumitha| ये क्या हो गया? इन्स्टा रिल्सवर पैसे, दागिने उधळून दाखवणाऱ्या रिलस्टारच्या घरात चोरट्यांनी मारला १ कोटींचा डल्ला

तक्रारीत ६१ टक्क्यांची वाढ

जगभरातून मुलांच्या सुरक्षेबाबतचे उल्लंघन करणारे ६८.२ टक्के व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. स्वयंमचलीत व्यवस्थेने ९८.६ टक्के व्हिडिओ प्रथम फ्लॅग केले होते. भारतातून गुगलकडे कंटेट हटवण्याच्या मागणीत गेल्या ६ महिन्यात ६१ टक्के वाढ झाली आहे.

भारतीय कोर्ट आणि गव्हर्नमेंट एजन्सीकडून गुगल पाठोपाठ युट्यूबला देखील सर्वाधिक कंटेट हटवण्याच्या रिक्वेस्ट गेल्या आहेत. गुगलकडे जानेवारी आणि जूनमध्ये गेलेल्या ४००६ रिक्वेस्टमधील ३३९९ रिक्वेस्ट या भारतातून गेल्या होत्या. गुगलच्या सर्व सर्व्हिसेसला भारतातून गेल्या सहा महिन्यातून गेलेल्या रिक्वेस्टमध्ये ६१ टक्क्यांची वाढ झाली आहे. जवळपास ६५ हाजर ०९१ आयटम्स हटवण्याची रिक्वेस्ट गेली होती.

YouTube Video Removed
9 year old YouTuber : ९ वर्षांच्या यूट्यूबरचा प्रताप! व्ह्यूज वाढवण्यासाठी वडिलांच्या ऑफिसच्या कार्डमधून खर्च केले १.१३ कोटी

भारताच्या एकूण रिक्वेस्टपैकी पोलिसांकडून पाठवण्यात आलेल्या रिक्वेस्ट या ७२ टक्के आहेत. तर यात कोर्टाकडून पाठवण्यात आलेल्या रिक्वेस्टची संख्या कमी आहे. सर्वाधिक रिक्वेस्ट या मानहानी संदर्भातील असतात. भारताच्या मागणीनंतर गुगलने स्थानिक कायद्यांचे उल्लंघन करणारे १९ हजार ८८३ आयटम हटवले आहेत. तर १ हाजर ४१५ आयटम्स हे स्वतःच्या पोलिसिंगनंतर हटवण्यात आले आहेत. गुगलने १९ हजार ४०२ आयटम्सवर कोणतीही कारवाई केली नाही. तर १७ हजार ४७३ आयटम्सबाबत पुरेशी माहिती मिळाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.