

दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात आक्रमक झालेला पाहिला मिळत आहे. भारत पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलताना दिसत आहे. शनिवार भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात- निर्यातीवर बंदी घातली. या निर्णयाने पाकची कोंडी झाली असतानाच भारत सरकारने पुन्हा महत्त्वाचे मोठे निर्णय घेतले आहेत.
टपाल आणि पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित
भारत सरकारने आज (दि.३) पाकिस्तानमधून हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची देवाणघेवाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे दळणवळण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
समुद्र सीमांवर देखील मर्यादा
तत्पुर्वी पाकिस्तानचा ध्वज असलेल्या जहाजांना कोणत्याही भारतीय बंदरात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना देखील पाकिस्तानच्या कोणत्याही बंदरात जाण्याची परवानगी नाही, असे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने जारी अधिसुचनेत म्हटले आहे.