

India Respond To Donald Trump On halt Russian oil purchases :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून कच्च तेल खरेदी करणार नाही असं आश्वासन दिल्याचं सांगितलं. त्यानंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रायलाच्या प्रवक्त्यांनी यावर उत्तर दिलं आहे. त्यांनी भारत हा आपल्या नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीकोणातून आपली कच्च तेल आयात धोरण ठरवतो असं सांगितलं.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी माध्यमाच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की, 'भारत हा कच्च तेल आणि गॅसचा प्रमुख आयातदार आहे. उर्जा संसाधनांची अस्थीर परिस्थिती पाहता भारताचं कायम भारतीय ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्याचं धोरण राहिलं आहे. आमची कच्च तेल आयात करण्याच्या धोरणाचा मूळ उद्येश हा भारतीय ग्राहक आणि त्याचं हीत हाच आहे. उर्जा संसाधनाचे स्थीर दर आणि सुरक्षित पुरवाठा हे आमच्या उर्जा धोरणाचे दोन उद्येश आहेत. यात आमच्या उर्जा संसाधनाचा स्त्रोत वाढवणं आणि बाजाराची स्थिती पाहता त्यात योग्य ती विविधता आणणं याचा देखील समावेश आहे.'
रणधीर जैस्वाल पुढे म्हणाले, 'अमेरिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्हाला आमच्या उर्जा स्त्रोताच्या कक्षा रूंदावण्यास अनेक वर्षे लागली आहेत. गेल्या दशकभरात यात सतत वाढ होत आहे. सध्याचं युएसचं सरकार भारतासोबतचं उर्जा सहकार्य अजून वाढवण्यास उत्सुक आहे. याबाबत चर्चा सुरू आहे.'
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींनी रशियाकडून कच्च तेल खरेदी न करण्याचं आश्वासन दिलं आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जैस्वाल यांची ही प्रतिक्रिया आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे खूप मोठं पाऊल असल्याचं देखील म्हटलं होतं. यामुळं रशियावर जागतिक दवाब वाढणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
ट्रम्प यांनी हे वक्तव्य एफबीआयचे संचालक काश पटेल यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केलं होतं.