

Donald Trump Called Giorgia Meloni Beautiful:
परिणामांची अन् कोण काय म्हणतंय याची फिकीर न करता बेधडक वक्तव्य करणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असतील. ते कधी काय बोलून जातील याची भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही. असाच एक किस्सा इजिप्तमध्ये झालेल्या गाझा समिटवेळी घडला. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी असं काही वक्तव्य केलं की त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे जॉर्जिया या गाझा समिटमध्ये सामील होणाऱ्या एकमेव महिला नेत्या होत्या.
इजिप्तमधील गाझा समिटमध्ये डोनाल्ड ट्रम्प मेलोनी यांना म्हणाले, 'तुम्हाला ब्यूटीफुल म्हटलं तर चालेल ना...? ट्रम्प पुढं म्हणाले, 'मला हे (तुम्हाला ब्यूटीफुल) म्हणण्याची परवानगी नाही. कारण असं म्हणणं म्हणजे तुम्ही तुमचं राजकीय करिअर संपवण्यासारखं आहे. त्या एक सुंदर आणि तरूण महिला आहेत. जर तुम्ही युनाटेड स्टेट्समध्ये महिलेसाठी ब्यूटीफुल हा शब्द वापरला तो तुमच्या राजकीय कारकिर्दीचा अंत ठरेल. मात्र मी ही जोखीम घेतो.'
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मेलोनी हा हसायला लागल्या. मेलोनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझामधील शांतता आणि भरभराटीसाठी केलेल्या कराराचं गुणगान केलं.
ट्रम्प मेलोनी यांच्याबद्दल बोलताना वळले आणि त्यांनी मेलोनी यांच्याकडं पाहिलं. त्या त्यांच्या उजव्या बाजूला उभ्या होत्या. त्यानंतर ट्रम्प म्हणाले, 'तुम्हाला सुंदर म्हटलेलं चालतं ना? तुम्ही आहातच सुंदर! तुम्ही इथं आला त्याबद्दल आभारी आहे. त्यांना इथं यायचं होतं. त्या खूप भारी आहेत. त्यांना इटलीमध्ये खूप मान आहे. त्या खूप यशस्वी राजकारणी आहेत.'
दरम्यान, ट्रम्प हे जे काही बोलत होते त्यावेळी जॉर्जिया मेलोनी यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते. गाझा शांतता समिटनंतर सोशल मीडियावर याचीच चर्चा होती. मेलोनी यांनी ज्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांची स्तुती करत मॅन ऑफ पीस असं म्हटलं आणि शांततेच्या नोबेल प्राईजसाठी पुन्हा नाव सुचवलं त्यावेळी मेलोनी यांनी धक्कादायक रिअॅक्शन दिली होती.