

Donald Trump On Narendra Modi :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रशियाकडून कच्च तेल खरेदी करणार नाही असं आश्वासन दिल्याचा देखील दावा केला आहे. याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले खूप चांगले मित्र असल्याचं आणि आमच्या दोघांमध्ये खूप चांगले संबंध असल्याचं देखील म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये एफबीआय संचालक काश पटेल यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही वक्तव्य केली. ते म्हणाले, 'त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की ते रशियाकडून कच्च तेल खरेदी करणार नाहीत.' ते पुढे म्हणाले, 'तुमच्या माहितीसाठी ही त्वरित होणारी प्रक्रिया नाही. त्याला काही कालावधी लागेल मात्र ते लकरच संपणार आहे.'
दरम्यान, एएनआयनं विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रॅम्प यांनी भारत हा एक विश्वासू सहकारी असल्याचं सांगितलं. 'हो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे मित्र आहेत. आमच्यात खूप चांगले संबंध आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय हे मला आवडलेलं नाही. त्यांनी आज मला आश्वस्त केलंय की ते रशियाकडून कच्च तेल आयात करणार नाहीत. आता चीननं देखील हेच करावं.'
ट्रम्प यांनी भारतानं रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत देखील आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, 'मोदी रशियाकडून तेल खरेदी करत आहेत हे आम्हाला आवडलं नव्हतं. त्यामुळं रशियाला युद्ध सुरू ठेवण्यास मदत मिळत होती. तिथं त्यांनी जवळपास दीड मिलियन लोकं गमावली आहेत. रशियानं जवळपास १५ लाख लोकं विशेषकरून सैनिक गमावले आहेत.'
ट्रम्प युक्रेन-रशिया युद्धावर म्हणाले की, 'हे युद्ध सुरू व्हायला नको होतं. मात्र हे युद्ध रशियानं पहिल्या आठवड्यातच जिंकायला हवं होतं. मात्र ते चार वर्ष झाले लढतायत.'
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना देखील सल्ला दिलाय. ते म्हणाले, 'आम्ही सर्व रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी हे सर्व थांबवावं. युक्रेनियन लोकांना मारण आणि रशियन लोकांना सुद्धा मारणं थांबवावं कारण ते रशियाच्या खूप लोकांना देखील मारत आहेत.'
'दोन नेत्यामध्ये एकमेकांबद्दल खूप राग आहे. तोच यात अडथळा ठरत आहे. मला आशा आहे की आम्ही त्या दोघांना एकत्र आणू. जर भारतानं रशियाकडून तेल खरेदी करणं बंद केलं तर ही गोष्ट खूप सोपी होऊन जाईल. ते युद्ध संपल्यानंतर परत रशियाकडून तेल खरेदी करू शकतात.'