India Pakistan Conflict | तणावामुळे पुन्हा आठ राज्यांमधील 37 विमानतळ बंद

प्रवाशांना जावे लागणार दुहेरी सुरक्षा तपासणीतून; दिल्लीतील उड्डाणेही रद्द
India Pakistan Conflict |
India Pakistan Conflict | तणावामुळे पुन्हा आठ राज्यांमधील 37 विमानतळ बंदPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्लीः भारत-पाकिस्तान तणावानंतर आठ राज्यांमधील 37 विमानतळ उद्या (शनिवार)पर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा समावेश आहे गुरुवारी दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द करण्यात आली.

पाकिस्तानने भारतावर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर नागरी विमान वाहतूक विभागाने एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. आता प्रवाशांना दुहेरी सुरक्षा तपासणीतून जावे लागणार आहे. यासाठी एअर इंडिया, अकासा, स्पाईसजेट आणि इंडिगो एअरलाइन्सनेही विमानतळावर तीन तास आधी पोहोचण्यास सांगितले आहे. श्रीनगर विमानतळावर हाय अलर्ट आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या सीमावर्ती जिल्ह्यांत शाळा बंद ठेवल्या आहेत.

India Pakistan Conflict |
India-Pakistan Conflict : पुणे विमानसेवेवर परिणाम, 9 उड्डाणे रद्द

जम्मू-काश्मीरमध्ये 10 जिल्ह्यांत शाळा बंद

संपूर्ण राज्यात हाय अलर्ट आहे. सीमावर्ती भागात सुरक्षा दलांची तैनाती.

जम्मू, कठुआ, सांबा, पूंछ, राजौरी, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यातील सर्व शाळा बंद. श्रीनगर विमानतळ आणि अवंतीपोरा हवाई तळाजवळील शाळाही बंद.

लेह-लडाखमध्ये ड्रोन-यूएव्हीवर बंदी

लेह जिल्ह्यात ड्रोन आणि यूएव्हीच्या उड्डाणांवर बंदी. ऑल लडाख हॉटेल अँड गेस्ट हाऊस असोसिएशनकडून पर्यटकांसाठी मोफत निवास व्यवस्था.

एअर इंडियाने शनिवारी (दि. 10 मे) सकाळी 5.29 वाजेपर्यंत 9 शहरांना जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली. यामध्ये जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटचा समावेश आहे.

दिल्ली विमानतळाच्या माहितीनुसार, विमानतळावरील कामकाज सामान्य आहे. पण हवाई क्षेत्र आणि सुरक्षेच्या कारणांमुळे काही उड्डाणांंना फटका बसला आहे. प्रवाशांना एअर लाईन्सकडून त्यांच्या फ्लाईटची माहिती मिळाल्यानंतरच विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.

इंडिगोने शनिवारी सकाळी 5.29 वाजेपर्यंत 11 शहरांची उड्डाणे रद्द केली. यामध्ये जम्मू, श्रीनगर, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, ग्वाल्हेर, किशनगड आणि राजकोटचा समावेश.

शनिवारपर्यंत 165 इंडिगो उड्डाणे रद्द. ही कंपनी रोज सुमारे 2200 उड्डाणे चालवते.

दिल्ली विमानतळावर विविध कंपन्यांची 20 उड्डाणे रद्द.

इंडिगोकडून 14 जूनपर्यंत अल्माटी आणि ताश्कंदला जाणारी थेट उड्डाणे स्थगित.

एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसकडून सुरक्षा दलांशी संबंधित लोकांना तिकीट रद्द केल्यास पूर्ण रिफंड मिळणार.

पंजाबमधील शाळा बंद, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

पंजाबमध्ये पुढील तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये पूर्णपणे बंद.

पंजाब पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द. अधिकार्‍यांच्या परवानगीनंतरच विशेष परिस्थितीत रजा मंजूर होणार.

पंजाब सरकारने सर्व सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलले.

हरियाणात आरोग्य कर्मचार्‍यांच्या रजा रद्द

हरियाणा सरकारचा डॉक्टरांना सतर्क राहण्याचा आदेश. ऑपरेशन विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या रजा रद्द. यासोबतच सरकारी आणि खासगी रुग्णालयांना 25 टक्के बेड आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव.

हिस्सार विमानतळावरील प्रवेश पूर्णपणे बंद .

India Pakistan Conflict |
India Pakistan Conflict | मुंबई येथील जवान मुरली नाईक उरी येथे शहीद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news