

India-Pak tensions
नवी दिल्लीः पाकिस्तानविरुद्धच्या कारवाया फक्त स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. भविष्य त्यांच्या वर्तनावर भारताची कारवाई अवलंबून असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केले. मात्र यानंतर काही तासांमध्येच सांबा आणि कठुआ जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात ड्रोन दिसले. मात्र सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. विमान वाहतूक कंपन्या इंडिगो आणि एअर इंडियाने यानंतर एक मोठे पाऊल उचलले असून, आज जम्मू, श्रीनगर, लेह, चंदीगड आणि राजकोट आणि अमृतसरला जाणाऱ्या सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.
उड्डाणे रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात इंडिगोने म्हटलं आहे की, नवीन घडामोडी लक्षात घेता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याने, जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी आणि जाणारी विमाने १३ मे २०२५ पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली आणि असेही म्हटले की आमचे पथक परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत.पुढील अपडेट्स प्रवाशांना त्वरित कळवल्या जातील. विमानतळावर जाण्यापूर्वी वेबसाइट किंवा अॅपवर तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासा, असे आवाहनही कंपनीने केले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते बंद करण्यात आलेल्या विमानतळांमध्ये हे सहा विमानतळ समाविष्ट आहेत. तथापि, सोमवारी सीमांवर शांतता प्रस्थापित झाल्यानंतर, त्या नागरी उड्डाणांसाठी पुन्हा उघडण्यात आल्या होता. दरम्यान, अमृतसरमध्ये खबरदारीच्या कारणास्तव ब्लॅकआउट झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी इंडिगोचे एक विमान नवी दिल्लीला परतले होते.
इंडिगोनंतर एअर इंडियानेही प्रवास सल्लागार जारी केला आहे. एअर इंडियाने म्हटले आहे की, नवीनतम घडामोडी आणि तुमच्या सुरक्षिततेमुळे, आज जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.