

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारच्या कार्यकारी आदेशानंतर सोशल मीडिया 'X' प्लॅटफॉर्मने भारतातील ८ हजारहून अधिक खाती ब्लॉक केली आहेत. जर कंपनीने आदेशाचे पालन केले नाही तर त्यांच्या स्थानिक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा भारत सरकारने दिला आहे. या आदेशांमध्ये आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थांचे आणि काही प्रसिद्ध X वापरकर्त्यांचे खात्यांचा समावेश आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून यादरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एका वृतानुसार समोर आली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीत भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेले तणाव आणि सोशल मीडियावर पसरवले जाणारे चुकीचे माहितीचे प्रसार आहे. सरकारने यापूर्वीही काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि सार्वजनिक व्यक्तींचे खाती बंद केली आहेत. यामुळे आंतराष्ट्रीय वृतसंस्था, अनेक वापरकर्त्यांसह विविध खात्यांवर परिणाम होऊ शकतो, असं 'X' (पूर्वीचे ट्विटर) कडून सांगण्यात येत आहे. भारताकडून पूर्णपणे 'X' प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद करण्यात येऊ नये, यासाठी या आदेशाचे पालन करण्यात येत असल्याचेही 'X' कडून सांगण्यात येत आहे. मात्र, X हॅन्डलने सरकारच्या या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.