Operation sindoor | पाकिस्‍तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ पडले तोंडघशी!

Pak Defence Ministar | भारताची विमाने पाडल्‍याचे पुरावे द्या म्‍हणताच बोलती बंद
Operation sindoor
पाकीस्‍तानचे संरक्षणमंत्री ख्वाज असिफ Canva Image
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्‍त केले आहेत. याचा चांगलाच धसका पाकिस्‍तानने घेतला असून त्‍यांचे मंत्री नेते घाबरुन बेताल वक्‍तव्य करत आहेत. पोकळ धमक्‍यांचे सत्र सुरु झाले आहे. आता या ऑपरेशन सिंधूमुळे पाकिस्‍तानचा चेहरा जगासमोर उघडा पडला आहे. भारताने राबविलेल्‍या मोहिमेनंतर एका विदेशी वृत्तसंस्‍थेला मुलाखत देताना त्‍यांचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची चांगलीच तारांबळ उडाल्‍याची दिसली.

सीएनएनने घेतलेल्‍या मुलाखतीवेळी ख्वाजा यांना एक प्रश्न विचारण्यात आला की पाकिस्‍तानने भारताची पाच विमाने पाडली आहेत त्‍याचा पुरावा द्या. यावर संरक्षणमंत्र्यांची बोलतीच बंद झाली. कारण याचे कोणतेही पुरावे त्‍यांच्याकडे नाही आहेत. केवळ जगासमोर मोठेपणा दाखवण्यासाठी त्‍यांचे मंत्री व माध्यमे खोटे दावे करत आहेत. आता आंतराष्‍ट्रीय मंचावरही त्‍यांचे हे आणखी एक खोटा दावा जगासमोर उघडा पडला आहे. सीएनएन च्या निवेदिकेने पुरावे मागताच ख्वाजा आसिफ यांना काय बोलावे हेच सुचेना. तोंड फिरवू लागले. त्‍यामुळे कोणतीही माहिती नसताना मुलाखत देण पाकिस्‍तानला तोंडघशी पाडणारे ठरले आहे.

Operation sindoor
Operation Sindoor: हा घ्या पुरावा! हल्ल्यापूर्वी आणि नंतर... Satellite फोटो समोर, पाकिस्तानची नाचक्की

सोशल मिडीयाच्या माहितीवर केला दावा

न्यूज अँकरने विचारले की पाच विमाने पाडली याचे पुरावे दाखवा. त्‍यावेळी आसिफ यांनी अजबच दावा केला ते म्‍हणाले की सर्व सोशल मिडीयावर हा दावा केला जात आहे. आणि भारतानेही हे मान्य केले आहे. अशी हास्‍यास्‍पद वक्‍तव्य त्‍यांनी केले. सर्व समाजमाध्यमांवर ही बातमी व्हारल होत आहे, भारतीय माध्यमेही याचा स्‍वीकार करत आहेत. असेही ते म्‍हणाले.

कोणत्‍या शस्‍त्रांनी विमाने पाडली ते सांगा ?

पुढे ते याच विषयावर हवेत गप्पा मारल्‍यासारखे फेकू लागले की भारताच्या विमांनाचे अवशेष हे काश्मीरमध्ये पडले आहेत. हे समाजमाध्यमांवरील व्हिडीओ व फोटोजवर दिसून येत आहे. यावर निवेदीकेने त्‍यांना रोखले व आम्‍ही सोशल मिडीयावरील दाव्याची येथे गोष्‍ट करत नाही तुम्ही अस्‍सल पुरावे सादर करा आणि कोणत्‍या शस्‍त्रांनी ही विमाने पाडली हे सांगा यावर त्‍यांची बोलतीच बंद झाली. त्‍यांनी या प्रश्नाचे उत्तर शेवटी दिलेच नाही.

Operation sindoor
Operation Sindoor | पंजाब सीमेवर तणाव! अमृतसरमध्ये क्षेपणास्त्राचे तुकडे सापडले; लष्कराने परिसर घेतला ताब्यात

पाकिस्‍तानने विमानांपासून रक्षण करण्यासाठी कोणत्‍या चिनी बनावटीच्या उपकरणांचा उपयोग केला आहे हे सांगा. यावर त्‍यांनी कोणतेही चिनी उपकरण वापरले जात नाही असे म्‍हटले पण नंतर लगेच पलटी मारली. आमच्याकडे चिन बनावटीची जेफ - 17 व जेएफ-10 ही लढावू विमाने आहेत हे कबूल केले. ते म्‍हणाले की भारत फ्रान्सकडून विमाने खरेदी करु शकते तर आम्‍ही चिन कडून का करु शकत नाही.

आतंकवाद्याना आम्‍ही पुरवतो पैसा

या मुलाखतीत ख्वाजा असिफ यांनी स्‍पष्‍ट कबूल केले की ते आतंकवादी पैसा पुरवतात. आसिफ यांनी यावेळी कबूल केले की पाकीस्‍तान खूप वर्षांपासून आतंकवाद्यांना पोसण्याचे काम करत आहे.तसेच अमेरिकेसाठी आम्‍ही खूप वर्षे काम केले आहे असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. याची किंमत आता पाकिस्‍तान मोजत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news