India CDS: लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, तर व्हाइस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांच्याकडे नौदलाची धुरा

केंद्र सरकारने शनिवारी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे पुढील 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' म्हणून नियुक्ती केली आहे.
India CDS Appointment 2026, Lt General Raja Subramani
India CDS Appointment 2026, Lt General Raja Subramanifile photo
Published on
Updated on

India CDS Appointment 2026

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शनिवारी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे पुढील 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' म्हणून नियुक्ती केली, तर व्हाइस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांची भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून निवड केली आहे.

राजा सुब्रमणी यांच्यावर दुहेरी जबाबदारी

लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणी हे 'सीडीएस' पदासोबतच लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही कार्यभार पाहतील. विद्यमान सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे २०२६ रोजी संपत असून, त्यानंतर सुब्रमणी आपली सूत्रे हाती घेतील.

India CDS Appointment 2026, Lt General Raja Subramani
oil companies loss | इंधन दर न वाढवल्याने भारतात तेल कंपन्यांना 30,000 कोटींचा फटका

लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणी यांचा अनुभव दांडगा असून १ सप्टेंबर २०२५ पासून ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी १ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान लष्कराचे उपप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मार्च २०२३ ते जून २०२४ या काळात त्यांनी 'सेंट्रल कमांड'चे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणूनही काम पाहिले आहे.

नौदलाचे नेतृत्व स्वामिनाथन यांच्याकडे

मुंबईतील पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख असलेले व्हाइस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन ३१ मे रोजी नौदल प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत असेल. १ जुलै १९८७ रोजी भारतीय नौदलात दाखल झालेले स्वामिनाथन हे 'कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर'मधील तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तसेच युनायटेड किंगडम आणि अमेरिकेतील नामांकित नेव्हल वॉर कॉलेजेसमध्ये उच्चशिक्षण घेतले आहे.

India CDS Appointment 2026, Lt General Raja Subramani
Red Corridor | शांततेच्या मार्गावर बस्तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news